सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ

सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ Subrahmaṇyana Candraśēkhara Bhāratīya Khagōlaśāstradnya

सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ

*स्मृतिदिन – ऑगस्ट २१ १९९५*

सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत.

 पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ.

 खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

चन्द्रशेखर यांचा जीवनप्रवास Life History Of Subrahmaṇyana Candraśēkhara

डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्वतः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.

डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.

शोध व संशोधन कार्य an Amendment Of Subrahmaṇyana Candraśēkhara

डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे “चन्द्रशेखर मर्यादा”. ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.

डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.

पुरस्कार Awards Of Subrahmaṇyana Candraśēkhara

हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)

ब्रुस पदक (इ.स. १९५२)

रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)

पद्मविभूषण (१९६८) – भारत सरकार

हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)

नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)

रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)

Subrahmanyan Chandrasekhar Indian Astronomer,

Mpsc Exam Syllabus Pdf Download

    All Exam Syllabus Pdf Download

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    About Prithviraj Gaikwad

    Check Also

    महत्वाचे शोध व संशोधक जीवन परिचय

    महत्वाचे शोध व संशोधक जीवन परिचय Introduction to Important Research and Researcher Life फ्री जॉब …

    स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

    स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

    नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ

    नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ Niels Bohr physicist फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट …

    Contact Us / Leave a Reply