हळदीचे गुणधर्म व उपयोग

हळदीचे गुणधर्म व उपयोग Properties and uses of Turmeric

हळदीचे गुणधर्म व उपयोग

🌿 हळद🌿

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. 

🍁हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. 

🍁ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात.[१] हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चवआणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात

.🍁 हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे[२]. ही वनस्पती बारमाही आहे.

🍁 हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो

.🍁पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

🍁जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. 

🍁हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. 

🌾🌾हळदीचे फायदे🌾🌾

ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. निद्रानाशाची समस्या कमी होते.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

🌹हळद लागवड🌹

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

 यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्‍तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे

. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल 23 हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या लिंक्स

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      Hygiene Science India Notes PDF Download

      Hygiene Science India Notes PDF Download

      कांजण्या लक्षणे उपचार माहिती

      कांजणा लक्षणे उपचार माहिती फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर …

      डाळिंब गुणधर्म व औषधी उपयोग

      डाळिंब गुणधर्म व औषधी उपयोग Pomegranate properties and medicinal uses डाळिंब गुणधर्म व औषधी उपयोग …

      Contact Us / Leave a Reply