महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार Maharashtratil Mruda V Tiche Prakar Mahiti

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

काळी मृदा

✔️बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात. ✔️मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.

✔️या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.

✔️ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.

✔️महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.

✔️महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.

⏩जांभी मृदा

✔️2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्‍चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.

✔️सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.

✔️या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.

✔️महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते. या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते.

✔️डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

गाळाची मृदा

✔️सततच्या संचयनामुळे नदी खोर्‍यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते. ✔️बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.

✔️महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.

✔️उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्‍यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.

✔️गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.

तांबडी-पिवळसर मृदा

✔️महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.

✔️ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.

✔️तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.

✔️मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अ‍ॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते. ✔️ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.

✔️या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात.

भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
Sr No.नावLink
1महाराष्ट्र राज्य भूगोल माहितीDownload Now
2जगातील उष्ण वारे नावे व प्रदेशDownload Now
3महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावेDownload Now
4भारतातील राष्ट्रीय उद्याने 10 सर्वात मोठीDownload Now
6जगातील देश व खंड नावे माहितीDownload Now
7जगातील शहरे व नद्या नावेDownload Now
8जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरेDownload Now
9जगाचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
10महाराष्ट्र राज्य भूगोल माहितीDownload Now
11महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती भाग 1Download Now
12Bhartiya Rajyghatna Sarav PrashnsanchDownload Now
13Hindi Gk Practice Question Set 12Download Now
14औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहितीDownload Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

BOBBLE – बे ऑफ बंगाल बाऊंड्री लेयर एक्सपेरिमेंट

फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा Free Job Alert …

प्रमुख भू प्रकार

प्रमुख भू प्रकार सर्व Mazasarav वर फक्त……. प्रमुख भू प्रकार फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड …

भारताची जणगणना/लोकसंख्या/जमाती

भारताची जणगणना/लोकसंख्या/जमाती जनगणना आयुक्त सी. चंद्रमौली यांनी १ मे २०१० पासून सुरू केलेल्या जनगणनेचे आयुक्त …

Contact Us / Leave a Reply