MMRDA कंत्राटदारांकडील १७ हजार पदांची भरती

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

Mumbai Metropolitan Region Development Authority MMRDA Recruitment 2020 – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरडीए भरती 2020

MMRDA Mumbai Recruitment 2020

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

एमएमआरडीए ऑनलाईन जॉब फेअर: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब मेळावा कौशल्य विकास विभागामार्फत विविध कंत्राटदारांच्या सुमारे 17,000 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदे भरली जातील. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालय 6 ते 8 जुलै 2020 आणि मुंबई उपनगरी व मुंबई शहर कार्यालये 8 ते 12 जुलै 2020 रोजी सकाळी 10 ते 06 या वेळेत आहेत. www.rojgar.mahaswayam.gov.in वेब पोर्टलवर ऑनलाइन जॉब फेअरचे आयोजन केले आहे. MMRDA Recruitment 2020

एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे १७ हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.

अर्ज कसा करावा

राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
तसेच, ज्यांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.

नोकरीचे ठिकाणः

मुंबई

MMRDA Recruitment 2020
mmrda

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

नोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा

jobtodays
jobtodays

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: mmrda recruitment 2020 apply online,mmrda recruitment 2020 notification,mmrda recruitment 2020 notification pdf,mmrda recruitment 2020 sarkari result,mmrda recruitment 2020,mmrda recruitment 2020-21,mmrda metro recruitment 2020,mmrda mumbai recruitment 2020,mmrda driver recruitment 2020,mmrda new recruitment 2020, mmrda bharti 2020,mmrda driver bharti 2020, Mumbai Metropolitan Region Development Authority MMRDA Recruitment 2020 , मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरडीए भरती 2020

About Prithviraj Gaikwad

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply