महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता संधी-गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा परीक्षेकरीता संधी- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता संधी
िषय:- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ परीक्षेकरीता संधी देणेबाबत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ करीता दिनांक २८ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून जाहिरात क्रमांक २४९/२०२१) वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार करण्यात आली होती. तथापि, कोरांनाच्या पाश्र्वभूमीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही २०२१/प्र.क्र.६९/कार्या- १२. दिनांक २७ डिसेंबर, २०२१ अन्वये दिनांक ०१ मार्च २०२० ने दिनांक १७ डिसेंबर, २०२१ (शासन निर्णयाचा दिनांक) या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. २. शासनाकडून प्रस्तुत दिनांक १७ डिसेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधील कमाल वयोमर्यादा ओलाडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणान्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
(१) अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी १०.०० वाजल्यापासून दिनांक ३१ डिसेंबर, २०२९ रोजी २३.५९ पर्यंत
रोजी १०.०० वाजल्यापासून दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ रोजी २३.५९ पर्यंत.
(२) ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१२ रोजी २३:५९ वाजेपर्यंत,
(३) भारतीय स्टेट चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्याची प्रत याकरीता विहित अंतिम दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९
(४) चलनाधार परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बैंमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०३ या कार्यालयीन वेळेल
जानेवारी २०२२
३. विषयोंकित परीक्षेकरीता दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून सहायक कक्ष अधिकारी आणि/अथवा राज्य कर निरीक्षक संवर्गाांकरीता विकल्प सादर केलेल्या परंतु वयाधिक असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाांकरीता विकल्प सादर करू न शकलेल्या उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक संवर्गाांकरीता विकल्प सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे संधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,
४. वरीलप्रमाणे विहित पद्धतीने व विहित कालावधीत अर्ज सादर करणान्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.
ठिकाण: मुंबई
सहसचिव, जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : ३१ डिसेंबर
ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत : ३१ डिसेंबर
भारतीय स्टेट बँकेत चलन भरण्याची अंतिम मुदत : ३ जानेवारी २०२२