2022 मध्ये सरळसेवेने भरणार 4500+ जागा?, 2022 सरळसेवा भरती. वित्त विभाग, शासन निर्णय दि.११.०२.२०१६ व दि. २५.०५.२०१७ अन्वये, सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
2022 मध्ये सरळसेवेने भरणार 4500+ जागा?
वित्त विभागाच्या अधिनस्त संचालनालय लेखा व कोषागारे व अधिनस्त कार्यालयांसाठी आवश्यक पदांचा आढावा वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक १८ ऑगस्ट २००८ अन्वये घेण्यांत आलेला असुन महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा निरनिराळ्या संवर्गातील एकूण ४६३२ ( जिल्हा परिषदांकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गामधील १३२ पदांसह) व वेळोवेळी शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेली एकूण १६३ पदे यासह सदयस्थितीत संचालनालय व अधिनस्त कार्यालयांची ४६५९ व जिल्हा परिषदांकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील १३६ अशी एकूण ४७९५ पदे मंजूर आहेत.
तथापी गेल्या ७ ते ८ वर्षाच्या कालावधीत कोषागारे व उपकोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालयाच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपात तसेच कामाच्या प्रमाणात झालेल्या बदलाचा व संगणकीकरणाचा वाढता वापर लक्षात घेवून संचालनालयाच्या सध्याच्या आकृतीबंधात बदल करणे आवश्यक होते. त्यानुसार संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई, मुख्यालय, विभागीय, जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालये तसेच त्यांचे अधिपत्याखालील इतर क्षेत्रीय कार्यालयातील पदांना शासन निर्णय, वित्त विभाग दि.०९.०६.२०१७ अन्वये मा. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित उपसमिती तथा छाननी समितीच्या मान्यतेनंतर नियमित ४००७, जिल्हापरिषदेच्या आस्थापनेवरील १३६, नवीन पदे-३३७ अशी एकूण ४४८० पदे तसेच बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण मनुष्यबळ संख्या १३४ अशा आकृतीबंधास • मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय सचिव समितीच्या दि.२३.०८.२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे मान्यता दिलेली आहे.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download