SRPF पोलिस भरती वर्ग 4 परीक्षा माहिती- लेखी परीक्षेचे स्वरूप – लेखी परीक्षेचा दर्जा/ स्तर
राज्य राखीव पोलीस बलातील वर्ग-४ कर्मचा-यांची २४० पदे भरण्याबाबत शासनाकडून वरिल संदर्भ क्र.१ व ३ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे. (सोबत गटनिहाय भरती करावयाच्या रिक्त पदांचा तक्ता जोडलेला आहे.) सर्व समादेशक यांनी त्यांच्या आस्थापनेवरील वर्ग-४ पदांची बिंदूनामावली अद्यावत करून भरती प्रक्रिया राबवावी. वरिल संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयातील भरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक | तत्वांचा वापर करावा. सदर शासन निर्णयातील नमूद सूचनांनुसार १२० गुणांची लेखी परिक्षा व ८० गुणांची व्यावसायीक चाचणी घेण्यात यावी. वरिल संदर्भ क्र. ४ अन्वये शासन परिपत्रकातील निर्देशाप्रमाणे {(OMR Vendor. (service provider )} निवड करण्याची प्रक्रिया राबविणे. सदर भरती प्रक्रिया राबविताना प्रत्येक टप्प्याची माहिती अपर पोलीस महासंचालक यांना कळविण्यात यावी.
तरी समादेशकांनी वर्ग-४ कर्मचा-यांची भरती करताना अवलंबिण्यात येणा-या कार्यक्रमाची सूची सात दिवसाच्या आत पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या मार्फतीने या कार्यालयास सादर करावी.
सहपत्र : वरील संदर्भान्वये दिलेले परिपत्रक / शासन निर्णय
(चिरंजीव प्रसाद)
अपर पोलीस महासंचालक,
राज्य राखीव पोलीस बल,
SRPF पोलिस भरती वर्ग 4 परीक्षा माहिती
लेखी परीक्षा…
(अ) लेखी परीक्षेचे स्वरूप:
१) ज्या पदांसाठी फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करावयाची आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील |प्रश्नांकरिता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा घेऊन निवड करण्यात यावी.
ज्या पदासाठी लेखी परीक्षा व शारिरिक चाचणी/व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चायणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ३० गुण ठेवून एकूण १२० गुणाची लेखी परीक्षा घेण्यात यावी.
३) लेखी परीक्षेच्या प्रश्रपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील. ४) जिल्हास्तरीय पदांसाठी निवड होणान्या उमेदवारांना संबंधित जिल्हयाचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इ. स्थानिक बाबींची/वैशिष्ट्यांची माहिती
असणे आवश्यक आहे. यास्तव सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना
सदर बाब विचारात घेण्यात यावी.
(ब) लेखी परीक्षेचा दर्जा/ स्तर:
लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न नसावा.
२) ज्या पदाकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
काळ्या शाईच्या बॉलपॉईंट पेनाचा वापर करणेबाबत: – लेखी परीक्षांकरिता जेथे उमेदवाराने उत्तर पत्रिकेवर पेनाचा वापर करणे अपेक्षित आहे तेथे (उदा. बैठक क्रमांक, परिक्षेसंबंधी इतर तपशिलाच्या लिखाणाकरिता, उत्तराच्या चिन्हांकरिता इ.) केवळ ळ्या शाईच्या बॉलपॉईंट पेनाचा वापर करणे आवश्यक आहे ही बाब संबंधित निवड समितीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्रे पाठचितांना उमेदवारांच्या निदर्शनास आणावी.
For more details download pdf