आधुनिक विज्ञानाचे टप्पे

आधुनिक विज्ञानाचे टप्पे Stages of Modern science

आधुनिक विज्ञानाचे टप्पे

इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो.

मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली.

संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात.

प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार –इटली.

विज्ञान उषाःकालाची कारणे –

१)वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उदय

२)धर्म सुधारणा चळ्वळ

३)मानवता वादाचा उदय

४)कॉन्स्टीटीनोपलचा पाडाव-१४५३

मध्ययुगात विज्ञानाची पिछेहाट होण्याची कारणेः-

समाज जीवनावरील धर्म संस्थेचा पगडा- धर्म संस्थांनी समाजावरील प्रभाव टिकवण्यासाठी समाज अंधश्रध्दाळू बनविला.धर्मग्रंथात जे काही लिहून ठेवले तेच अंतिम सत्य होय असा प्रचार केला. म्हणजेच शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांना महत्व प्राप्त झाले.

युरोपातील  प्रबोधन  किंवा पुनरुज्जीवनवादी चळवळीस सुरुवात -१४ व १५ वे शतक

विज्ञानाचा उषाःकालः-

रॉजर बेकन (१२१४ ते १२९४) –  रॉजर बेकनला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात.आधुनिक वैज्ञानिक विचारसरणी प्रथम पुरस्कार केला. रॉजर बेकन स्वतः वैज्ञानिक नसून एक तत्वज्ञ  होता त्याने केलेली अनेक वैज्ञानिक भाकिते सत्य ठरली. उदा- उडत्या मशिनची कल्पना,घोड्याशिवाय धावणारी गाडी, पाण्यावर चालणारे यंत्र इ. त्याच्या आपॅस मेजस ह्या शास्त्र विचारांचा ग्रंथात गणित विद्येचे महत्व स्पष्ट केले आहे.

ग्रंथ – ऑन बर्निंग ग्लासेस, ऑन द मार्व्हलस पॉवर ऑफ अन्व्हेन्शन अँड नेचर,कॉप्युटेशन ऑफ नॅचरल इव्हेंट्स इ.

डांटे (इ.स.१२६५ -१३२१) – इटलीच्या प्रसिध्द कवी  व तत्वज्ञ.ग्रंथ – दि दिव्हाइन कॉमेडी.

लियोनार्दो – द – व्हिन्सी (१४५२ -१५९९) – एक  थोर शास्त्रज्ञ,कल्पक इंजिनियर, शिल्पकार,वास्तूशास्त्र चित्रकार इ. नात्यांनी त्याची किर्ती फार मोठी आहे. त्याला संगीत व तत्वज्ञान यांची ही आवड होती. त्याची मोनालिसा, द लास्ट सपर ही चित्रे जगभर गाजली आहेत.या अलौकिक प्रतिभावंत कलावंताने विज्ञानाच्या  क्षेत्रातही आपली छाप पाड्ली होती.

प्रबोधनाच्या काळातील संपुर्ण मानव असा उल्लेख केला जातो.

त्याची कल्पना चित्रे – पाण चक्कीची कल्पना, पाणबुडी,पॅराशुट त्याचप्रमाणे हेलिकॉप्टर .

प्रयोगापेक्षा  त्याने केली आहे.झाडाच्या कापलेल्या खोडाच्या पोटी जितकी वर्तुळे दिसतील तित्की वर्षे त्या झाडाचे वय असे त्याने लिहून ठेवले आहे. अलेक्झांडर हंबोल्ट्ने १५ व्या शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून लियोनार्दो द व्हिन्सी चा गौरव केला आहे.

मॅडिनो – डी – लुझी याने ऍनाटोमिया हे शरीरशास्त्रावरील  पुस्तक सन १३१६ मध्ये तयार केले.

मायकेल अँजेलो (१४७५ – १५६४) – ह्याची चित्रकार व शिल्पकार म्हणून जगभर  ख्याती आहे.मोझेस,ख्रिस्तमाता,डेव्हीड  इ. पुतळे प्रसिध्द आहेत. रोमच्या व्हॅटिकन सिटीतील सिस्टिम चॅपेल च्या छ्तावरील भव्य चित्र,त्याचप्रमाणे दि. क्रिएशन व लास्ट जजमेंट ही दोन चित्रे आजही अजरामर होवून गेली.

आधुनिक विज्ञानाचे टप्पे

फ्रान्सिस बेकन (१५६१ – १६२६) – महान तत्वज्ञ,मुत्सद्दी, राजकारणी म्हणून प्रसिध्द होता. वैज्ञानिक पध्द्तीचा पाया घातला. दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून  त्याच्यावर विश्वास न ठेवता ती घटना स्वतः निरिक्षणाने खात्री करुन घ्यावी. ग्रंथ – ऑन द ऍड्व्हान्समेंट ऑफ  लर्निंग. नव्या शास्त्र पध्द्तीच्या वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा पुरस्कार नोहम ऑरगनम या ग्रंथात केला आहे. त्याच्या न्यू अट्लांटिस या ग्रंथात मानवाने हस्तगत केलेल्या कलांचे व शास्त्रांचे अभ्यास  पूर्ण विवेचन आहे. संशोधनाचे पहीले शास्त्र शुध्द परिगमन व वर्गीकरण  केले.

फ्रान्सिस बेकन हा विगमन (इंडक्टिव्ह) या तत्वज्ञान पध्द्तीचा जनक मानला जातो.

पेट्रार्क (१३०४ – १३३४) – दि फर्स्ट मॉडर्न मॅन म्हणून प्रसिध्द होता.

देकार्त(१५९६ – १६५०) – विज्ञान हे घटनांच्या निरिक्षणावर अवलंबून असते. विश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे. विश्लेषणात्मक भूमिती या नव्या गणित शास्त्राचा शोध लावला. जग हे वस्तूमय निव्वळ यंत्र आहे. विचारांचे सार शंका निर्माण होण्यात आहे.

ग्रंथ – पध्द्तीची मिमांसा. भुमिती व गणित संबंध प्रस्थापित केले.

विल्यम हार्वे (१५७८ – १६५७) – रुधिराभिसरणाचे (रक्ताभिसरण) स्पष्टीकरण व प्रयोग राजा चार्ल्स समोर दाखवून दिले.

ग्रंथ – De Motu Cordis (On the motion of Heart)

मालपिघी (१६२८ – १६९४)  – विल्यम हार्वेच्या रुधिराभिसरणाचे समर्थन केले. पेशी विज्ञानाचा वा शरीरबांधणीच्या शास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. त्याचा सर्वात महत्वाचा शोध हा सुक्ष्म रक्त वाहिन्यांचा शोध होय.

लिवेन हॉक – कार्नेलियस,डिब्रन,गॅलिलियो,डॉ हुक, स्टीफ न ग्रे इ. नी भिंगे  तयार केली तरी ख-या अर्थाने मायक्रोस्कोप तयार  करुन वापरला तो ऍटोनी लिवेन हॉक यांनी. जंतू विज्ञानाचा जनक म्हणून त्याची ख्याती आहे.

निकोलस कोपर्निकस (१४७३ – १५४३) – खगोल शास्

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      MPSC सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 1

      MPSC सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 1 mpsc question paper 2020 mpsc combine question papers with …

      4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती

      4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर …

      मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये

      मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये Micro Solar Dome and its Salient Features मायक्रो …

      Contact Us / Leave a Reply