महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जाहिरात माहिती Download pdf

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जाहिरात माहिती-महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार ; अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२१

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जाहिरात माहिती

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ जाहीर केली आहे. यंदा MAHATET 2021 परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२१ आहे. त्याचप्रमाणे राज्यात रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या ४० हजार पदांसाठी TAIT परीक्षासुद्धा घेतली जाण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून शासनाकडे वारंवार केली जात आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ जाहिरात माहिती


MAHATET 2021 परीक्षेशी संबंधित सर्व माहिती, ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टीईटी परीक्षा पेपर १ व २ साठीचे वेळापत्रक, परीक्षा फीस, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आराखडा व संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
MAHA TET 2021 वेळापत्रक
१.ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
३. टीईटी पेपर १ दिनांक व वेळ – १० ऑक्टोबर २०२१ वेळ सकाळी १०.३० ते १.००
४. टीईटी पेपर २ दिनांक व वेळ – १० ऑक्टोबर २०२१ वेळ दुपारी २.०० ते ४.३०

परीक्षा शुल्क
१. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. – ५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)
२. अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग – २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये (दोन्ही पेपर )

MAHA TET परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका आराखडा,अभ्यासक्रम व तयारी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जाहिरात माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा

(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक
१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
महत्वाचे संदर्भ पुस्तक


१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
2.मराठी भाषा(30 गुण)
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
के’सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ


3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
के सागर/बाळासाहेब शिंदे


4.गणित (30 गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
नितीन महाले/शांताराम अहिरे/ सतीश वसे
5.परिसर अभ्यास (30 गुण)
यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.


महत्वाची संदर्भ पुस्तके
१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/प्रा.अनिल कोलते/विनायक घायाळ
घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक – के’सागर (चौथी आवृत्ती)
परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक


TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. 2013 ते 2019 पर्यंत TET परीक्षा 6 वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या 6 प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास सुरवात केल्यास परीक्षभिमुख अभ्यास होईल, तसेच परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते लक्षात येईल.
प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक
TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2019 च्या मागील 6 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह – डॉ.शशिकांत अन्नदाते,के’सागर पब्लिकेशन्स,पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा

(2)TET पेपर 2 अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 11 ते 14 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
महत्वाचे संदर्भ पुस्तक


१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के’ सागर पब्लिकेशन्स, पुणे
2.मराठी भाषा(30 गुण)
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके


के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
के सागर/बाळासाहेब शिंदे


4.गणित व विज्ञान (60 गुण)
यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
संदर्भ पुस्तके
नितीन महाले/शांताराम अहिरे/सतीश वसे
4.2- विज्ञान (30 गुण) विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
प्रा.अनिल कोलते/कविता भालेराव/विनायक घायाळ


5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)
5.1- इतिहास (30 गुण)
इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
5.2 – भूगोल.(30 गुण)
भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात.
संदर्भ पुस्तके
१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ
१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा

टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी

★ बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
★मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
★टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.
★वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.
★बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
★परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
★इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.
★शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
★प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
★टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
★परीक्षेला सकारात्मकतेने “टीईटी पास होणारच” या आत्मविश्वासाने सामोरे जा.

          Best of luck

आपल्या एका share करण्याने गरजू विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळेल

About Prithviraj Gaikwad

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply