1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)-1 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download Now.1 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

पंतप्रधान मोदींची घोषणा देशाच्या अन्नदात्यांना मिळणार 20 हजार कोटी रुपये :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचं सांगितलं.
  • यानुसार 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
  • तर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे.
  • तसेच या अंतर्गत 20 हजार कोटी रुपयांचा 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फायदा होईल.
1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारत आता निर्यातही करणार, ‘ब्रह्मोस’:

  • भारताची एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश.
  • स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे.
  • मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत.
  • तर आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.
  • यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.
  • याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते.

स्मृतीला सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन :

  • भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाला 2021मधील तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील दिमाखदार कामगिरीसाठी ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन लाभले आहे.
  • तर इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेले ली आणि आर्यलडची गॅबी लेविस या तीन क्रिकेटपटू स्पर्धेत आहेत.
  • तसेच स्मृतीला वर्षांतील सर्वोत्तम महिला ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूचे नामांकन देण्यात आले होते.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) 2021 या वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार 23 जानेवारीला घोषित करण्यात येणार आहेत.
  • 25 वर्षीय सलामीवीर स्मृतीने वर्षांतील 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 38.86च्या सरासरीने एकूण 855 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

भारत ठरला पहिला आशियाई देश :

  • सेंच्युरियन हे दक्षिण आफ्रिकेमधील सर्वात आव्हानात्मक मैदान मानले जाते.
  • तर या मैदानावर आफ्रिकेवर पहिल्या कसोटी सामन्यात मिळवलेला विजय हा भारताच्या अष्टपैलू पराक्रमाची साक्ष देतो, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने संघसहकाऱ्यांची प्रशंसा केली आहे.
  • आफ्रिकेत सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट स्टेडियमवर कसोटी विजय मिळवणारा भारत हा गुरुवारी पहिला आशियाई देश ठरला.
  • भारताने 2021 या वर्षांची सुरुवात ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात हरवून केली होती, तर वर्षांचा समारोप आफ्रिकेवर विजयानिशी केली.

क्विंटन डी कॉकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :

  • दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत पराभव झाल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे.
  • भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीतही तो फार काही चांगला खेळ करु शकला नाही. दोन्ही डावात तो अपयशी ठरला.
  • सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला.
  • भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो खेळणार नाही.

भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता :

  • भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे.
  • दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने DLS पद्धतीनुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला.
  • यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कपवर जिंकला आहे.
  • पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला.
1 January 2022 Current Affairs In MarathiDownload pdf
2 January 2022 Current Affairs In Marathi Download pdf

About Sayli Bhokre

Check Also

20 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

20 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-20 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

14 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

14 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-14 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

12 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

12 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-12 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

Contact Us / Leave a Reply