Admit Cards for health recruitment in two days : आरोग्य भरतीचे प्रवेशपत्र दोन दिवसात.
आरोग्य भरतीचे प्रवेशपत्र
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
Admit Cards for health recruitment in two days
राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असणारी आरोग्य विभागाच्या गट क आणि ड ची पद भरती दिनांक २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणार असून लाखो तरुणांनी यासाठी अर्ज केले आहेत. पद भरती परीक्षा अगदी दोन दिवसांवर असतांना या प्रक्रिये साठीच्या संकेतस्थळावर काही अडचणी येत आहेत. परीक्षा काही दिवसांवर राहिलेली असतांना प्रवेश पत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोर जावं लागतं आहे. हे खेदजनक असून याबाबत त्वरित उपाययोजना करण्यासंदर्भात आज युवसेनेच्या कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांच्याशी संपर्क साधला. पुढील दोन दिवसात या सर्व अडचणी दूर होतील आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळतील असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले असल्याची माहिती यादव यांनी दिली.
यादव म्हणाले, राज्यातील विद्यार्थी कोरोनाच्या भीषण संकटा सोबत लढता लढता बेरोजगरीशी देखील झुंज देत आहेत अशा स्थितीत अखेर परीक्षा होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. एककीकडे राज्यसरकार तरुणांना दिलासा द्याचा प्रयत्न करत असताना परीक्षा यंत्रणा आणि प्रशासन यांचे विद्यार्थ्यांच्या कडे वारंवार दुर्लक्ष होताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ६,१४४ पदांसाठी दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी पद भरती परीक्षा होत आहे. परीक्षेच्या अंतिम तयारीसाठी काही दिवस शिल्लक असतांना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यास येत असलेल्या अडचणी मुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा उल्लेखचं नाही तर काही विद्यार्थ्यांचे फोटो नाहीत. या सगळ्या अडचणीमुळे नेमकी परीक्षा द्यायचं कुठे ? विद्यार्थ्यांच्या तपासणी विना फोटो प्रवेश पत्रावर कसे होणार ?
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download