हरितगृह परिणाम
हरितगृह परिणाम Greenhouse effect
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्या (Short Waves) रूपाने येते. पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्या (Lonh waves) रूपाने आढळते.
वातावरणातील जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साईड हे घटक सूर्याकडून पृथ्वीकडे येणार्या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत.
परंतु पृथ्वीकडून अवकाशात उत्सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्या अध:स्तरात अडलेल्या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्हणतात.
हरितगृह परिणामामुळेच पृथ्वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टीचे अस्तित्व आढळते. म्हणजेच हरितगृह परिणाम आवश्यक व
उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्यासाठी प्लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.
प्लास्टिक कागदामुळे पृथ्वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते.
वाढलेल्या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्या प्रदेशात प्लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो.
या रचनेला ग्लास हाऊस असे म्हणतात. या ग्लास हाऊसमध्ये अत्यंत कमी तापमान असणार्या प्रदेशातही पिके घेता येतात.
हरितगृह परिणामात वाढ:-
मानवाच्या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साइड यांच्याप्रमाणेच कार्बन मोनोक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, सल्फर ट्राय ऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्साइड, क्लोरोफ्ल्युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत.
त्यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ’ असे म्हणतात.
ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्य कारण आहे.
हवामान बदलाचे परिणाम अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे आढळतात:-
सागर जल पातळीत वाढ
महासागरांचे आम्लीकरण
मासेमारीवर परिणाम
प्रवालींचा नाश व विरंजन
हिमरेषांच्या उंचीत वाढ
तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.
Mpsc Exam Syllabus Pdf Download
- अमरावती तलाठी भरती 2026 – 56 पदांची संपूर्ण माहिती
- मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 2643 पदे | PDF डाउनलोड
- महाडिस्कॉम भरती २०२५ – १२० व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि अधिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज
- कृषि विज्ञान केंद्र अमरावती भरती २०२०
- अमरावती जिल्हा सरकारी नोकरी
All Exam Syllabus Pdf Download
- अमरावती तलाठी भरती 2026 – 56 पदांची संपूर्ण माहिती
- मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 2643 पदे | PDF डाउनलोड
- महाडिस्कॉम भरती २०२५ – १२० व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि अधिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज
- कृषि विज्ञान केंद्र अमरावती भरती २०२०
- अमरावती जिल्हा सरकारी नोकरी
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
Serch Your Dream Jobs