Jagacha Bhugol Sarav Prashnsanch

Jagacha Bhugol Sarav Prashnsanch करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ पहिले राज्य.

Jagacha Bhugol Sarav Prashnsanch

करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ पहिले राज्य.

३० जानेवारीला केरळमध्ये करोना व्हायरसचा एक रुग्ण होता. १३ एप्रिलला ही संख्या ३७८ आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १९८ करोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत. २७ मार्चला केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण आढळले. १२ एप्रिलला म्हणजे दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अवघे दोन करोनाग्रस्त आढळले. १८ जानेवारीला केरळच्या आरोग्य मंत्रालयाने Covid-19 चा अलर्ट जाहीर केला व परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एक हेल्थ कार्ड दिले गेले. ज्यामध्ये त्यांच्याकडून प्रवासाची हिस्ट्री आणि अन्य आजार याबद्दलची माहिती भरुन घेतली जायची. विमानतळावर रुग्णवाहिका आणि जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सीची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली. ताप, सर्दी आणि घशाचा त्रास अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना तात्काळ करोनासाठी बनवण्यात आलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात यायचे.

चार फेब्रुवारीला केरळने Covid-19 राज्यासाठी धोकादायक असल्याचे जाहीर केले. खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे आणि औषधांची खरेदी केली. जिल्हा रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करायला सांगितली. अशा प्रकारच्या उपायोजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन केरळने करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले.

देशात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. पण त्याच केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार आहे. केरळने करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख कसा कमी केला? त्यावर कसे नियंत्रण मिळवले? हे समजून घेणे महत्वाचे आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

केरळने सर्वप्रथम करोना चाचण्यांचा वेग वाढवून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढले व सक्तीचा २८ दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड, याची प्रभावी अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेचा क्वारंटाइनसाठी जो कालावधी आहे. त्यापेक्षा दुप्प्ट दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड ठेवला. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे शक्य झाले.

या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    महत्वाचे शब्द : राष्ट्रीय सभा अधिवेशने, Rashtry Congress Adhiveshane

    About Prithviraj Gaikwad

    Check Also

    कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे

    कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे वाचून काढा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त …

    सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    सराव प्रश्नसंच डाउनलोड करा. Sarav Question Set या ठिकाणी शासनाच्या सर्व विभागातील तसेच काही खाजगी …

    भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 1

    भारतीय राज्यघटना प्रश्नसंच या प्रश्नसंच मध्ये भारताच्या सविधान ची महत्वाची प्रश्नउत्तरे आहेत Bhartiy Rajyaghatana Sarav …

    Contact Us / Leave a Reply