कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे वाचून काढा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. Corona IMP Questions and Answers

Corona IMP Questions and Answers

प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?

 उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴

 प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?

 उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे. याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2). novel म्हणजे नवीन. या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.

प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?

 उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.

प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?

 उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).

प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहील का?

 उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे

प्रश्न 6. हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?

 उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.

प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांना हा आजार होत नाही का?

 उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.

 प्रश्न 8. मांसाहार करणार्‍या व्यक्तींना हा आजार होतो का?

 उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)

प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?

 उत्तर = 1. ताप 2. सर्दी 3. श्वास घेताना अडचण होणे 4. थकवा 5. कोरडा खोकला

प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?

 उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे

 प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?

 उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.

प्रश्न 12. हा आजार कसा पसरतो?

 उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्‍या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.

प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?

 उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0) हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.

 प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?

 उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.

प्रश्न 15. हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?

 उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे 1. हवा = 3 तास 2. तांबे = 4 तास 3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस 4. स्टील = 2 ते 3 दिवस 5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस

प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?

 उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब

.copued

About Prithviraj Gaikwad

Check Also

सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

सराव प्रश्नसंच डाउनलोड करा. Sarav Question Set या ठिकाणी शासनाच्या सर्व विभागातील तसेच काही खाजगी …

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 1

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच या प्रश्नसंच मध्ये भारताच्या सविधान ची महत्वाची प्रश्नउत्तरे आहेत Bhartiy Rajyaghatana Sarav …

परीक्षा सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

परीक्षा सराव प्रश्नसंच दिले आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता Examwise Sarav Prashnsanch फ्री जॉब …

Contact Us / Leave a Reply