म्हाडा परिक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द (२०२१-२२)-Mhada exam revised timetable 2021-22-Mhada parksha sudharit velapatrak 2022
म्हाडा परिक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द (२०२१-२२)
दि.०३.०१.२०२० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा २०२० संयुक्त पेपर क्र. १ चा सुधारित दि. २९.०१.२०२२ व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा २०२० संयुक्त पेपर क्र. २. पोलीस उपनिरीक्षक चा सुधारित दि. ३०.०९.२०२२ असा आहे.
उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व म्हाडा प्राधिकरण या दोहोंच्या परिक्षा देण्यास अडथळा येऊ नये याकरीता म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर-६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीता दि.२९.०१.२०२२ व दि.३०.०९.२०२२ या दिवशी सहा सत्रांमध्ये होणारी ऑनलाईन परिक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परिक्षेचा सुधारित दिनांक म्हाडा संकेतस्थळावर लवकरच जाहिर करण्यात येईल. उर्वरित क्लस्टर मधील परिक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील.
सचिव
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण