MPSC Group C Exam Information Download Pdf

MPSC Group C Exam Information Download Pdf-महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना 2022, age limit foe mpsc group c exam, qualification for group c exam, syllabus for mpsc group c exam, mpsc group c new update.

Jobtodays.com Logo
Jobtodays.com Logo

कोणत्याही परीक्षेला लक्ष्य करण्यासाठी, अभ्यासक्रमात तयारीचे नियोजन कसे करावे लागेल याचे विहंगावलोकन दिले जाते. अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला MPSC गट C परीक्षा 2022 च्या परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम विचारला आहे. म्हणून, या लेखाद्वारे, आम्ही खाली PDF सह नवीनतम MPSC गट C परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी सर्व आवश्यक तपशील प्रदान करतो. कोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेणे आवश्यक असते. जर तुम्हाला योग्य आणि परिपूर्ण अभ्यासक्रम माहित असतील तर तुम्ही चांगली तयारी करू शकता आणि परीक्षेत यश मिळवू शकता.

विद्यार्थ्यांनी MPSC अभ्यासक्रम आणि लक्ष्यित तयारीसाठी परीक्षेच्या पद्धतीबद्दल अगदी स्पष्ट असणे आवश्यक आहे. खालील सर्व तपशील पहा. परीक्षेच्या तयारीपूर्वी एमपीएससी ग्रुप सी अभ्यासक्रम पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे. MPSC गट C परीक्षा अभ्यासक्रम pdf मध्ये प्रिलिम्स, मुख्य आणि कौशल्य चाचणीसाठी अभ्यासक्रम तपशील समाविष्ट आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) उपनिरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), कर सहाय्यक आणि लिपिक टायपिंग यासारख्या MPSC गट C परीक्षा 2022 च्या विविध पदांची भरती करण्यासाठी त्यांची अधिकृत अधिसूचना प्रकाशित करेल.

एमपीएससी परीक्षेचा पॅटर्न तीन टप्प्यांवर आधारित आहे:

1.पूर्वपरीक्षा

2.मुख्य परीक्षा

3.कौशल्य चाचणी

१.२ शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या पदांचा तपशील, पदसंख्या, आरक्षण, अर्हता. इत्यादी बाबी जाहिरात/ अधिसूचनेद्वारे उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील.

२. परीक्षेचे टप्पे :

२.१ प्रस्तुत पाचही संवर्गातील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

२.२ संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवारांकडून ते यांपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे, याबाबत विकल्प (Option) घेण्यात येईल.

२.३ जाहिरातीस अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे एखाद्या आणि अथवा सर्व संवर्गाकारीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवगांच्या पद भरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील.

२.४ संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना दिलेला विकल्प तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन. सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे तीनही पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.

२.५ संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांची

स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

२.६ सर्व संवर्गाकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक १ सामाईक असेल व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल. २.७ मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ मात्र संबंधित संवर्गाच्या कर्तव्ये व जबाबदा-या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल.

२.८ संबंधित संवगांच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

२.९ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेसाठी पात्र येते.

२.१० पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच, पूर्व परीक्षेचे गुण उमेदवारांना कळविले जाणार नाहीत. २.११ संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करताना दिलेला/ले विकल्प व माहिती अंतिम समजण्यात येईल व त्याच्या आधारेच पुढील भरती प्रक्रिया होईल,

२.१२ संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करताना दिलेला/ले विकल्प व अर्जामध्ये नमूद माहिती यामध्ये बदल करण्याबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत नंतरच्या टण्यावर मान्य करण्यात येणार नाही.

३. उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन :

३.१ वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच, प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.

३.२ एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.

३.३ एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अर्थ प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

३.४ वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

४. पात्रता:

४.१ भारतीय नागरिकत्व

४.२ वयोमर्यादा:

४.३ विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

४.४. अर्हता:

४.४.१ शैक्षणिक अर्हता

४.४.१.१ उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

४.४.१.२ उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

(१) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा

(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

४.४.१.३ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

४.४.१.४ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

४.४.१.५ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

४.४.२ शारीरिक अर्हता

दुय्यम निरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे:

४४४.३ कर सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी टंकलेखन अर्हता:

४.४.३.१ कर सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन आना असणे आवश्यक आहे:

४.४.३.२ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक एसपीई १०१२/(१०८/१२)/साशि-१. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१३ अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता- बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट (लागू असेल त्याप्रमाणे) समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे.

४.४.३.३ शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची उपरोक्त टंकलेखन अहंता मुख्य परीक्षेकरीता अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे.

४.४.४ टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (कर सहायक व लिपिक-टंकलेखक पदाकरीता):

(१) दिव्यांग उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग-२०१६/प्र.क्र.११६/१६-अ, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

(२)माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८, दिनांक १३ जून, २०१९ अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणा:या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही

४.४.५ लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) पदावर नियुक्त होणा-या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत) नियमावली. १९९९ अथवा त्यानंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार एतदर्थ मंडळाची विहित गतीची मराठी टंकलेखनाची परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

४.५ परीक्षेच्या संधी :

४.५.१ आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांस संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे नि करण्यात आली आहे:

(१) अराखीव (खुला) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहतील. (२) अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

(३) खुला (अराखीव)/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व अनाथ उमेदवारांकरीता कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. (४) उर्वरित मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.

४.५.२ उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील:

(१) उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.

(२) उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्या परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.

(३) प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणापु स्वतंत्रपणे करण्यात येईल. (४) संबंधित संवगांच्या सेवाप्रवेश नियमातील वयोमर्यादेच्या गणनेसह

इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. (५) शासनाकडून संबंधित सामाजिक प्रवर्गाकरीताची विहित केलेल्या उच्च वयोमर्यादेपर्यंतच उमेदवारास त्यांना देय असलेल्या संधीच फायदा घेता येईल.

६.३.२ उपरोक्त जिल्हा केंद्रांमधून कोणतेही एक केंद्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना निवडणे आवश्यक आहे.

६.३.३ जिल्हा केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी वाढ अथवा बदल होऊ शकतात. ६.३.४ विहित पध्दतीने ऑनलाईन माहिती सादर करताना उमेदवारांने निवडलेले जिल्हाकेंद्र व उपलब्धतेनुसार जिल्हा केंद्रावरील विविध परीक्षा उपकेंद्रावर पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

६.३.५ एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हाकेंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुस-या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल.

६.३.६ एकदा निवडलेल्या जिल्हा केंद्रामध्ये अथवा आयोगाने निश्चित केलेल्या परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.

६.३.७ वरीलप्रमाणे जिल्हा केंद्रनिवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसुली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत आयोगाचे त्या त्या वेळचे धोरण व आयोगाचा निर्णय अंतिम मानण्यात येईल.

६.४ पूर्व परीक्षेचा निकाल:

६.४.१ मरावयाच्या प्रत्येक संवर्ग/पदाकरीता स्वतंत्रपणे निकाल जाहीर करण्यात येईल.

६.४.२ संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करताना उमेदवारांकडून घेतलेल्या विकल्पाच्या आधारे तसेच प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाांकरीता (उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक

टंकलेखक) भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे १२ पट उमेदवार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील, अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची स्वतंत्र सीमारेषा (Cut Off Line) निश्चित करण्यात येईल. तद्नंतर, दुस-या टप्यात प्रत्येक प्रवर्गातील पदांसाठी १२ पट उमेदवार उपलब्ध होतील. अशा रीतीने सीमारेषा खाली ओढली जाईल. तथापि, अशा पध्दतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुस-या टण्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गासाठीच्या पदावरच निवडीसाठी पात्र असतील.

६.४.३ अराखीव (खुला) पदांकरीता निश्चित करण्यात आलेल्या सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाईल. अराखीव(खुला) पदांकरीता निश्चित करण्यात आलेली सीमारेषा शिथिल करुन मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतील.

६.४.४प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांना त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ते विहित अटींची पूर्तता करतात असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

६.४.५ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच आयोगाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल,

६.४.६ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल व निकाल जाहीर झाल्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला आयोगाकडील नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे वैयक्तिकरित्या कळविण्यात येईल. तथापि, लघुसंदेशाद्वारे वैयक्तिकरित्या कळविण्याची सुविधा ही अतिरिक्त सुविधा असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला निकाल हाच अधिकृत मानण्यात येईल.

६.४.७ संयुक्त पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टिने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असल्याने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली जात नाही अथवा यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जात नाही. ६.४.८ जाहिरातीस अनुसरून पूर्व परीक्षेकरीता अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रे/पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.

७. मुख्य परीक्षा

त्या टप्प्यावर कागदपत्र/पुरावा सादर

७.१ प्रत्येक पदाकरीता विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल..

७.२ परीक्षेस प्रवेश:

७.२.१ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या सीमांकन रेवा व मर्यादेनुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरण्याच्या तसेच जाहिरात/ अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची पूर्तता करणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

७.२.२ मुख्य परीक्षेकरीता आयोगाच्या जिर्यालयाकडून अधिसुचना निर्गमित झाल्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे अर्ज करता येईल. त्यावेळी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी | आयोगाने विहित केलेल्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही.

७.२.३ संबंधित संवर्ग/पदाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास स्वतंत्रपणे अर्ज सादर करून प्रत्येक संवर्ग/पदाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. |

७.२.४ प्रस्तुत पदाच्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतेवेळी आवश्यक शैक्षणिक अथवा टंकलेखन अर्हता नसल्यास व शैक्षणिक अथवा टंकलेखन अर्हता, मुख्य परीक्षेकरीता आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त केल्यास अशा उमेदवाराला शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल. इतर कोणत्याही दाव्यामध्ये बदल करता येणार नाही.

७.३. संवर्गाचा पसंतीक्रम (केवळ लिपिक-टंकलेखक पदाकरीता):

७.३.१ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना लिपिक-टंकलेखक संवर्गापकी ज्या संवर्गासाठी अर्ज केला आहे. तो संवर्ग (लिपिक टंकलेखक मराठी अथवा इंग्रजी) नमूद करणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही संवर्गासाठी अर्ज करावयाचा असल्यास त्याप्रमाणे नमूद करणे आवश्यक आहे. ७.३.२ पसंतीक्रम दर्शविलेल्या संवर्गाांकरीता टंकलेखनाचे विहित मर्यादेच अर्हता प्रमाणपत्र नसल्यास संबंधित संवर्गागांचा पसंतीक्रम रद्द करण्यात येईल.

७.३.३ संवर्गाचा पसंतीक्रम नमूद करण्याची फक्त एकच संधी खालील अटींवर देण्यात येईल. (१) पसंतीक्रम अनलाईन पध्दतीने मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करतानाच अजांमध्ये दर्शविणे आवश्यक राहील.

(२) पसंतीक्रम दर्शविलेल्या संवर्गाांकरीता टंकलेखनाचे विहित मर्यादेच अहंता प्रमाणपत्र नसल्यास संबंधित संवर्गाचा पसंतोक्रम रह

५.४ विहित पद्धतीने माहिती सादर करताना उमेदवाराने निवडलेले परीक्षा केंद्र व उपलब्धतेनुसार जिल्हा केंद्रावरील विविध परीक्षा उपकेंद्रावर पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

७.५.५ एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हाकेंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुस-या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल.

७.५.६ एकदा निवडलेल्या परीक्षा केंद्रामध्ये अथवा आयोगाने निश्चित केलेल्या उपकेंद्रामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.

७.५.७ वरीलप्रमाणे जिल्हा केंद्रनिवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत आयोगाचे त्या त्या वेळचे धोरण व आयोगाचा निर्णय अंतिम मानण्यात येईल.

८. लेखी परीक्षेचा निकाल:

संयुक्त पेपर क्रमांक-१ तसेच प्रत्येक वर्ग/पदाकरीता स्वतंत्रपणे घेण्यात येणा-या पेपर क्रमांक २ चे गुण एकत्रित करून प्रत्येक परीक्षेचा निकाल प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येईल.

९. भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे (Opting out option) :

९.१ प्रत्येक संवर्गाच्या अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधरण गुणवत्ता यादी (Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

९.२ सर्वसाधरण गुणवत्ता यादीच्या आधारे – भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे (Opting Out) हा पर्याय आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांकडून प्राप्त भरतीप्रक्रियेतून बाहेर पडणे हा पर्याय लक्षात घेऊन अंतिम शिफारस यादी M तयार करण्यात येईल.

९.५ पदभरतीकरीता भरतीप्रक्रियेतून बाहेर पडणे याबाबतची कार्यवाही फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित कालावधीमध्ये करणे अनिवार्य आहे. यासंदर्भातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या तसेच नंतरच्या टप्प्यावर पर्याय रद्द करण्यासंदर्भात केलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.

१०. टंकलेखन कौशल्य चाचणी (केवळ लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदाकरीता):

१०.१ दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या तसेच माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

१०.२ लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

१०.३ टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अहंताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल,

१०.४ लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवगांच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.

१०.५ लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) व कर सहायक संवगांकरीता स्वतंत्रपणे टंकलेखन कोशल्य चाचणी घेण्यात येतील.. कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.

१०.७ लेखनिक/सहायकाची मागणी करणा-या अंध/अल्पदृष्टी उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार परिच्छेदाचे लेखन सांगणारा व्यक्ती (Passage) Dictator) उपलब्ध करुन देण्यात येईल. (लागू असेल त्याप्रमाणे)

१०.८ टंकलेखनातील त्रुटी/चुकांसंदर्भात एकूण कळ अवनमन (Key Depression) च्या शेकडा प्रमाणात त्रुटी/चुका पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. १०.९ टंकलेखन कौशल्य चाचणी करीता उपस्थित उमेदवारांना संगणक/किबोर्ड/इत्यादी हाताळताना सुलभता व्हावी, याकरीता उमेदवारांना प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्यापूर्वी १० मिनिटांची सराव चाचणी देता येईल. त्यानंतर ३ मिनिटांचा विश्रांतीकाळ राहील व तदनंतर १० मिनिटांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल.

९०.१० टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उमेदवारांना संबंधित भाषेतील परिच्छेद तसेच सदर परिच्छेदातील कळ अवनमन संख्या उपलब्ध करुन देण्यात येईल.

१०.११लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी व कर सहायक संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार प्रस्तुत पदांकरीता टंकलेखन प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

१९. शिफारस:

उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” मध्ये नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार उमेदवारांच्या शिफारसी शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात १९.९ येईल. १९.२ गुणांची सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी तसेच महिला, खेळाडू, माजी सैनिक व दिव्यांग व्यक्ती

इत्यादीसाठी वेगवेगळी असेल. १२.३ प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ते विहित अटींची पूर्तता करतात. असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पात्र समजण्यात येईल.

११.४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असलेल्या विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब). विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), व इतर मागास वर्ग या प्रवगांतील उमेदवार तसेच महिला व पात्र खेळाडू उमेदवार लेखी परीक्षेत केवळ त्यांच्यासाठी विहित केलेल्या निम्न सीमारेषेनुसार अर्हताप्राप्त झाल्यास अंतिम शिफारशीच्या वेळी त्याची उमेदवारी केवळ त्या त्या संबंधित प्रवर्गासाठी विचारात घेतली जाईल. निम्न सीमारेषेनुसार अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी | अराखीव खुला पदासाठी विचारात घेतली जाणार नाही.

२१.५ दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक अथवा अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू या प्रवर्गाच्या किमान सीमारेषेच्या आधारे शिफारशीसाठी पात्र ठरणा या उमेदवारास कोणताही एक सवलत घेता येईल.

११.६ सर्व लेखी परीक्षमधून पात्र होण्याकरीता शतमत (Percentile) पध्दत लागू आहे,

१९.७ प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणा-या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारशीसाठी पात्र असतील:

(१) अमागास किमान ३५ शतमत

(२) मागासवगॉव- किमान ३० शतमत

(३) दिव्यांग- किमान २० शतमत

(४) अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू. किमान २० शतमत (५) माजी सैनिक किमान २० शतमत

(६) अनाथ- किमान ३० शतमत

१९.८ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार) उपलब्ध पदांएवढ्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे किया नाही याबाबत उमेदवारांना प्रोफाईलद्वारे कळविण्यात येईल.

१९.९ शिफारसप्राप्त प्रत्येक उमेदवारास आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवाराच्या प्रोफाईलद्वारे व आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर लघुसंदेशद्वारे (एसएमएस) कळविण्यात येईल तसेच शिफारस झालेल्या उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील,

१२. प्रमाणपत्र पडताळणी :

१२.९ शिफारसपात्र उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी सक्षम प्राधिका-वाकडून बालविण्यात येईल. १२.२ आयोगाने निश्चित केलेल्या किमान सीमारेषेनुसार अहंताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/ शासन परिपत्रकातील अहंता/अटी

शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे सक्षम प्राधिका-याकडून तपासलो जाईल.

१२.३ अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणा-या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल,

१२.४ विहित कागदपत्रे सादर करू न शकणा-या उमेदवारांची उमेदवारो रद्द करण्यात येईल. तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. १२.५ वरीलप्रमाणे लेखी परीक्षेच्या निकालाआधारे पात्र ठरणा-या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी सक्षम प्राधिका-याकडून निश्चित आलेल्या कार्यक्रमानुसार तसेच सक्षम प्राधिका-याने निश्चित केलेल्या ठिकाणी व विहित वेळेत घेण्यात येईल. त्याकरीता उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल,

१२.६ अजांतील दाव्यानुसार सक्षम प्राधिका-याकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्तो देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिका-यांकडून करण्यात येईल.

उत्तरपत्रिकेची प्रत व इतर तपशील :

१३.१ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या पेपरची उत्तरपत्रिका संबंधित परीक्षेच्या निकालानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलद्वारे खालील तपशीलासह उपलब्ध करून देण्यात येईल :

(१) मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज

(२) निकालाकरीता गृहित धरलेले गुण

(३) उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाांकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा..

१३.२ वरीलशील उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिल्यानंतर याबाबतची माहिती उमेदवारांना संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

१४. प्रस्तुत परीक्षा योजना उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप समजण्यास सुलभता व्हावी या हेतूने प्रसिध्द करण्यात येत असून यामधील कोणतीही | तरतूद प्रस्तुत परीक्षेची जाहिरात/ अधिसूचना, संबंधित शासन निर्णय व आयोगाच्या कार्यनियमावली यांमधील तरतूदीशी विसंगत असल्यास त्या-त्यावेळच्या परीक्षेची जाहिरात/ अधिसूचना संबंधित शासन निर्णय तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदी ग्राहा धरण्यात येतील.

MPSC गट क 900 पदांची जाहिरात.view
MPSC Group C Exam Information Download PdfDownload pdf
MPSC Combine C गट परीक्षा अभ्यासक्रम PDF 2021Download Pdf
MPSC गट क परीक्षा पात्रता निकष 2021Download Pdf

About Jobtodays Admin

Check Also

PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune Mahagarpalika

PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune Mahagarpalika PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune …

MPSC विधिसेवा गट क 2022 फॉर्म भरणे चालू झाले आहे

MPSC गट क 2022 फॉर्म भरणे चालू झाले आहे,Mpsc group c application 2022,MPSC विधिसेवा गट …

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022-MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF …

One comment

  1. Pingback: MPSC Exam Information maharashtra public service commission

Contact Us / Leave a Reply