संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार 1

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार 1 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार 1

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार 1

  • अवलंब करणे – स्वीकार करणे, आधार घेणे.
  • अकांड तांडव करणे (आकांड तांडव करणे) – रागाने आदळआपट करणे.
  • अंग चोरणे – अंग रारवून काम करणे.
  • अंग टाकणे – शरीराने कृश होणे, रोडावणे.
  • अक्कल पुढे करणे – बुद्धीचा भलताच उपयोग करणे.
  • अंगावर शेकणे – मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे.
  • अंगाचा तीळपापड होणे – अतिशय संताप येणे.
  • अंगाची लाही लाही होणे – क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.
  • अंगावर मूठभर मांस चढणे – धन्यता वाटणे.
  • अंगावर रोमांच उभे राहणे (अंगावर काटा उभा राहणे) -भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.
  • अग्निदिव्य करणे – कठीण कसोटीतून पार पडणे, प्राणांतिक संकटातून जाणे.
  • अंगवळणी पडणे – सवय होणे.
  • अंगावर मास नसणे – कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.
  • अंग शहारून टाकणे – अंगावर रोमांच उभे राहणे.
  • अंग चोरून बसणे (अंग मारून बसणे) – अवघडून बसणे.
  • अंगीकारणे – स्वीकारणे.
  • अंगाचा खुर्दा होणे – शरीराला त्रास होणे.
  • अंगावर घेणे – एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.
  • अंगाचे पाणी पाणी होणे – घाम येणे.
  • अंग मोडून काम करणे – खूप मेहनत करणे.
  • अंग काढून घेणे (अंग काढणे) – अलिप्त राहणे, संबंध तोडणे.
  • अंगाचा भडका उडणे – क्रोधामुळे अंगाची आग आग होणे.
  • अंतर देणे – सोडून देणे, त्याग करणे.
  • अंग झाडून मोकळे होणे – संबंध तोडणे.
  • अंगात त्राण नसणे – अंगातील शक्ती नाहीशी होणे.
  • अंगाने चांगला आडवा असणे – सशक्त असणे.
  • अंगात कापरे सुटणे – भीतीने थरथरणे.
  • अंगावर धावून येणे – मारावयास येणे.
  • अंगावर तुटून पडणे – जोराचा हल्ला करणे.
  • अटकेपार झेंडा लावणे – फार मोठा पराक्रम गाजविणे.
  • अटीतटीने खेळणे – चुरशीने खेळणे.
  • अठरा विश्वे दारिद्र्य असणे – अतिशय गरिबी असणे.
  • अडकित्त्यात सापडणे – पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.
  • अडचणींचा डोंगर असणे – अनेक अडचणी येणे.
  • अवाक्षर न काढणे – एकही अक्षर न बोलणे.
  • अंतःकरण भरून येणे – हृदयात भावना दाटून येणे, भावनानी गहिवरून येणे.
  • अनुमती विचारणे – परवानगी मागणे.
  • अंतःकरणाला पाझर फुटणे (अंतःकरण विरघळणे) – दया येणे.
  • अंतःकरण तीळतीळ तुटणे – अतिशय वाईट वाटणे.
  • अंतःकरण विदीर्ण होणे – अतिशय दुःख होणे.
  • अंतःकरणाचा कोठा साफ असणे – मन स्वच्छ असणे.
  • अंतरीचा तळीराम गार होणे – इच्छा तृप्त होणे.
  • अंतर्मुख होणे – खोलवर विचार करणे.
  • अंतर्धान पावणे – नाहीसे होणे.
  • अंकित राहणे – गुलाम होणे, वश होणे.
  • अंत पाहणे – अखेरची मर्यादा येईपर्यंत थांबणे.
  • अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीच्या मानाने खर्च करणे.
  • अत्तराचे दिवे जाळणे – भरपूर उधळपट्टी करणे.
  • अद्वा तद्वा बोलणे – एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे.
  • अन्नास जागणे – उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे.
  • अनर्थ गुदरणे (ओढवणे) – भयंकर संकट येणे.
  • अनावर होणे – भावविवश होणे.
  • अन्नास मोताद होणे – उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे.
  • अवगत असणे – ठाऊक असणे.
  • अन्नावर तुटून पडणे – खूप भूक लागल्याने भराभर जेवणे.
  • अन्नास लावणे – उपजीविकेचे साधन मिळवून देणे.
  • अदृश्य होणे – लुप्त होणे, नाहीसे होणे.
  • अनुमताने चालणे – संमतीने वागणे.
  • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे – थोड्याशा यशानेच गर्व करणे.

About Sayli Bhokre

Check Also

रेल्वे परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा

रेल्वे परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा रेल्वे भारतीच्या सर्व महत्वाच्या PDF Notes यामध्ये उपलब्ध आहेत …

रेल्वे परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड

RRB Syllabus & Exam Pattern – Candidates writing the various exams conducted by the Railway Recruitment …

Contact Us / Leave a Reply