संपूर्ण मराठी शब्दसंग्रह म्हणी व अर्थ -20

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20

  • शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी पुरत नाही  – उसनी अक्कल वेळेवर उपयोगी पडत नाही 
  • शिंदळीच्या घरी हत्ती पण सतीच्या घरी नाही बत्ती – जगात दुर्जनांच्या घरी वैभव आढळते पण सज्जनाला दारिद्र्यातच दिवस काढावे लागतात 
  • शिष्य पडला गुरू अडला  – दुसर्‍याच्या चुकीवरुन शहाणपण शिकणे 
  • शीर सलामत तो पगडी पचास  – मनुष्य खंबीर असला तर अनेक पराक्रम करेल 
  • शेजी चा भात अन् आईचा हात  –  दुसर्‍याने कितीही केले तरी आईची बरोबरी कधीच होत नाही 
  • शेंडा ना बुडखा  – ना आरंभ ना शेवट
  • शेताचे फुल, चालवी जगाची चूल  – सर्व जग शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असते 
  • शेरास सव्वाशेर- जगात एकापेक्षा एक वरचढ आहेत 
  • श्रींच्या मागोमाग ग येतो  – श्रीमंतांच्या सोबत अभिमान येतो 
  • श्रीखंडाचा बेत दह्याला त्रास  – भलत्याच मनुष्याची कुरकुर श्रीमंताची वारी गरिबाला नरोटी  – पात्रते प्रमाणे सत्कार होत असतो 
  • शिक्याचे तुटले नि बोक्याचे फावले  – एकाचे नुकसान हेच दुसर्‍याचा फायदा असणे 
  • सगळेच मुसळ केरात- मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे
  • सरड्याची धाव कुंपणापर्यंतच- प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते
  • समर्था घरचे श्वान त्याला सर्व देती मान – मोठाच्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो
  • संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात – एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे
  • संग तसा रंग – संगती प्रमाणे वर्तन असणे
  • सारा गांव मामाचा एक नाही कामाचा     – जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे
  • साप साप म्हणून भुई धोपटणे – संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे
  • सात हात लाकुड नऊ हात ढलपी – एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे
  • सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी – एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे
  • सुरुवातीलाच माशी शिंकली – आरंभालाच अपशकून
  • सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – वैभव गेले तरी ताठा जात नाही
  • स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे –          वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार  – भाग्यवान माणसाला कशाशीच उणीव पडत नाही 
  • सुंठावाचून खोकला गेला  – उपचाराशिवाय दोष निवारण होणे 
  • स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही  – अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही
  • स्वतः मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो – उथळ पाण्याला खळखळाट फार 
  • सर्पाला दूध पाजले तरी विषच ओकणरा – दुष्ट मनुष्यास कितीही चांगली वागणूक दिली तरी त्याच्यातील दुष्ट पणा जात नाही 
  • संसार पाण्याचा बुडबुडा  – संसार क्षणभंगुर आहे 
  • संसाराच्या बारा वाटा  – संसारात अनेक भानगडी असतात
  • साखर हातावर, कातर मानेवर  – गोड बोलून गळा कापणे
  • साखरेला मुंग्या लागणारच  – जेथे लोभ लाभ तेथे माणसे जमणारच 
  • सांग पाटला काय लिहू  – दुसर्‍याच्या मताने वागणे 
  • सारवा भिंती म्हणे कोनाड किती  – नुसती चौकशी करणे 
  • सारा चोरांचा बाजार  – सारेजण लबाड 
  • सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा  – दुसर्‍या वर पूर्णपणे अवलंबित व्यक्ती 
  • साठी बुद्धी नाटी- म्हातारपण आले की बुद्धी ठळते 
  • सातासमुद्राच्या पलीकडे  – अतिशय दूर 
  • सासू मेली उन्हाळ्यात आसू आले पावसाळ्यात  – एखाद्या गोष्टीचा संबंध भलतीकडेच लावणे 
  • सुरतेला भला , कंबरेचा ढिला  – दिसायला सुंदर पण अशक्त 
  • सोन्याहून पिवळे  – अतिशय उत्तम 
  • सोने नाही गुंजभर न बायको मागे रत्नहार  – जवळ काही नसताना मोठमोठे बेत करणे 
  • सोन्याची मेख तमाशा देख  – पैशाने सर्व काही करता येते 
  • सोंगे केले सजून दिवटी गेली विझून- ऐन वेळे वर काही अडचण येऊन काम बिघडते 
  • सोनाराकडून कान टोचला म्हणून दुखत नाही  – योग्य व्यक्तीकडून केलेले काम चांगले होते 
  • सोन्याचा काही गुण सोनाराचा काही गुण  – कामासाठी निरनिराळ्या गुणांची आवश्यकता असते 
  • स्मशानी बसावे पण एकटे नसावे  – माणसाने नेहमी संगती करावे 
  • स्वार्थी आले अन् शास्त्री गेले  – चांगले जाऊन वाईट येणे 
  • संख्या झाली फार अन् देशाला झाला भार  – अतिरेक झाला तर नुकसानच होते 
  • संसाराच कोड जे करीन ते थोड  – कितीही केले तरी कमीच पडते 
  • सत्तेपुढे शहाणपण येत नाही  – ज्याच्याकडे अधिकाराचे बळ आहे तो वाटेल ते करू शकतो 
  • सारी सोंगे करता येतात पण पैश्याचे सोंग करता येत नाही  – जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते 
  • सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही  – क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये 
  • हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते – आजार, संकटे येतात ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात
  • हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा- खोटे अश्रू ढाळणे
  • हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा – मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे
  • हत्ती गेला पण शेपूट राहिले – कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला
  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्‍याला देणे स्वतःला झीज लागू न देणे
  • हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते – जेथे भलेभले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात
  • हात ओला तर मित्र भला –       म्हणजेच तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात
  • हात फिरे तिथे लक्ष्मी वसे – उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते
  • हातच्या काकणाला आरसा कशाला –    स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply