SIAC सामाईक प्रवेश परीक्षा २०२२

SIAC सामाईक प्रवेश परीक्षा २०२२-STATE INSTITUTE FOR ADMINISTRATIVE CAREERS (SIAC), MUMBAI-Government of Maharashtra-(UPSC CIVIL SERVICES EXAMINATION for IAS/IPS/IFS/ IRS, etc-2022

( प्रि-आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर व नाशिक हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस समोर, मुंबई ४०० ००१

Tel. No: 022-22070942 web: www.siac.org.in. e-mail:sinc1915@gmail.com

SIAC सामाईक प्रवेश परीक्षा २०२२

जाहिरात

सामाईक प्रवेश परीक्षा २०२२

UPSC – नागरी सेवा परीक्षा, २०२२ च्या पूर्व तयारीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC CIVIL SERVICES EXAMINATION for IAS/IPS/IFS / IRS, etc.) • नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता पूर्व प्रशिक्षणसाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर व नाशिक या सहा केंद्रातील प्रवेशासाठी विनामूल्य प्रशिक्षणकरीता ऑनलाईन पद्धतीने सामाईक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) रविवार, दि. १६/०१/२०२२ वेळ सकाळी ११.०० ते १.०० या वेळात घेण्यात येईल.

प्रवेश परीक्षा पध्दत:

ऑनलाईन परीक्षा २०० गुण व मुलाखत ५० गुण अश्याप्रकारे सामाईक प्रवेश परीक्षा एकूण २५० गुणांची राहील. व ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर (नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्या अभ्यासक्रमाप्रमाणे घेण्यात येईल. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पेपर व पेपर II स्वतंत्र न घेता एकाच प्रश्नपत्रिकेत (भाग व भाग II) या प्रमाणे विभागणी करण्यात येईल. त्यात सामान्य अध्ययन भाग 1 (५० प्रश्न / १०० गुणांचा) व भाग II (कलमापन चाचणी CSAT) (४० प्रश्न / १०० गुणांचा) राहील.

गुणवत्ता यादीप्रमाणे शासकीय नियमांच्या अधिन राहून विदयार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी दिलेले प्रशिक्षण केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

शैक्षणिक पात्रता:

उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा:- (दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी)

१) वय २१ ते ३२ वर्ष (खुला संवर्ग)

२) वय २१ ते ३५ वर्ष (इ.मा.व./वि.मा./ वि.जा./भ.ज./EWS.) (३) वय २१ ते ३७ वर्ष (अनु. जाती/जमाती)

अधिवास:

उमेदवार महाराष्ट्राचा रहीवाशी (Domicile of Maharashtra) असावा अथवा शा. नि. मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६ दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील असल्यास उमेदवाराने अर्जात उमेदवार पात्रता परीक्षा महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील निर्देशित गाव किंवा शहरातील संस्थेमधून उत्तीर्ण झाल्याचे नमूद करणे असेल, तसेच अर्जासोबत प्रवेशाच्या वेळी संबंधित उमेदवारानी त्यांच्या पालकांचे महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील रहीवासी असल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, तसेच उमेदवाराची मातृभाषा मराठी असल्याचे संस्थेच्या प्राचार्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच १०वी ची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वसतीगृह व्यवस्था व विद्यावेतन :

शासनाच्या परवानगीने ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यास अल्पसंख्यांक, बार्टी व स्थानिक रहिवासी बगळून इतर उमेदवारांना गुणांनुक्रमे उपलब्धतेनुसार वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार देण्यात येईल.

प्रवेश शुल्क:

१) खुला प्रवर्ग (सर्वसाधारण):- रु. ५००/

२) मागास प्रवर्ग :- रु. २५०/- ( इ.मा.व./ वि.मा. वि.जा./भ.ज./ EWS/ अनु. जाती/जमाती)

प्रवेश शुल्क भरणा ऑनलाईन पध्दतीनेच करावा लागेल.

प्रवेशासंबंधी महत्वाच्या सुचना:

१) उमेदवाराने अर्जामध्ये सहा प्रशिक्षण केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र निवडणे अनिवार्य आहे. एकदा निवडलेल्या केंद्रामध्ये बदल करता येणार नाही.

२) एस. आय.ए.सी. मुंबई व महाराष्ट्रातील इतर भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व केंद्रांमध्ये पूर्व परीक्षा प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना त्याच केंद्राकरीता अर्ज करता येणार नाही.

(३) प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाईन असल्याने कोणतेही शैक्षणिक प्रमाणपत्र या कार्यालयात पाठविण्यात येऊ नये. प्रमाणपत्रांची पडताळणी प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी केली जाईल,

४) प्रवेशाच्या वेळी खालीलप्रमाणे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहिल

● विद्यापीठ पदवी गुणपत्रिका/ विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र, • जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र.

मूळ स्थानांतरण प्रमाणपत्र / महाविद्यालय सोडल्याचा दाखला Transfer Certificate/leaving Certificate ),

• महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र.

• नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध असावे.

सदरील कागदपत्रांची पुर्तता न झाल्यास प्रवेश निश्चित होणार नाही.

५) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एस. आय.ए.सी. मुंबई व महाराष्ट्रातील इतर भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रयांचे संकेतस्थळ खालीलप्रमाणे आहे.

(६) प्रवेशित उमेदवाराने प्रशिक्षण संस्थेकडून अथवा शासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

राहील.

७) आदर्श उत्तर तालिका, निकाल, गुणवत्ता यादी व प्रवेश यादी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबईच्या

संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात येईल. याबाबत कोणत्याही उमेदवाराला वैयक्तिक कळविण्यात येणार नाही. ८) प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरताना किंवा ऑनलाईन परीक्षा देतांना काही तांत्रिक अडचणी आल्यास उमेदवारांनी मोबाईल क्रमांक +९१८०९७०९४९४७ व ई-मेल support@siacexam.org वर संपर्क साधावा. ९) ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराला कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्याकरीता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई किंवा इतर कोणतेही प्रशिक्षण केंद्र जबाबदार राहणार नाही, तसेच कोणत्याही परिस्थितीत फेर

परीक्षा घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

(१०) प्रवेशासंदर्भात संबंधित केंद्रांच्या संचालकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

११) परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व संस्थेच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

१२) प्रवेशित विदयार्थ्यांना केंद्रीय लोक सेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ देणे बंधनकारक असेल.

System Requirement for Online Exam

(1) Personal Laptop, Desktop, Tab, or Smartphone

(2) Web Cam for establishing identity and monitoring. (3) Internet Connection of at least 1mbps

(4) Latest Google Chrome Internet Browser (pre-installed)

If you are a MAC user, then follow the following instructions (1) Download www.googlechrome.dmg file

(2) Install this application by double-clicking on it..

(3) After installation move to google chrome of the application folder.

ठिकाण : मुंबई दिनांक: ०९.१२.२०२९

सही/

संचालक

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई

( समन्वयक, सामाईक प्रवेश परीक्षा)

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 2022 Download Now

म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध- Mhada hallticket uplabdha 2022 -Mhada admit card available 2022- …

MPSC PSI/STI/ASO हॉलतिकीट उपलब्ध 2022 Pdf Download

MPSC PSI Hall Ticket 2022-MPSC Subordinate Services Admit Card 2022-MPSC Group B Hall Ticket 2021 …

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर MPSC राज्य सेवापूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर-MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा …

Contact Us / Leave a Reply