Current affair November 2021 online test-4-sarva spardha parkshan karita upyukta Chalu Ghadamodi-Current Affiars free Onine test 2021-Current affair test paper 2021
- भारतातली पहिली शहरी सहकारी बँक कोणती जी RBIच्या स्वयंसेवी संक्रमण योजनेंतर्गत लघु वित्त बँकेत (SFB) रूपांतरित झाली
उत्तर :- शिवालिक मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक (शिवालिक स्मॉल फायनान्स बँक बनली).
- भारतीय रिझर्व्ह बँकेनी 250 कोटी रुपयांच्या प्राथमिक योगदानासह ‘____’ तयार केला आहे, ज्याचा अधिग्रहणकर्त्यांना स्तर-3 ते स्तर-6 केंद्रे आणि ईशान्य राज्यांमध्ये PoS पायाभूत सुविधा तैनात करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपयोग केला जाणार
उत्तर :- ‘देयके पायाभूत सुविधा विकास निधी’ (Payments Infrastructure Development Fund).
- जागतिक बँकेच्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था _____ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे
उत्तर :- 9.6 टक्के.
- जागतिक बँकेच्या मते, 2021 साली भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ____ होण्याची शक्यता आहे
उत्तर :- 5.4 टक्के.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि _____ यांच्यात चौदा क्षेत्रातल्या “विशिष्ट कौशल्य कामगार” संबंधित प्रणालीच्या योग्य संचालनासाठी भागीदारीच्या मूलभूत कार्यचौकटीवर सहकार्य करण्यासाठी करार करण्यास मान्यता दिली
उत्तर :- जपान सरकार.
Current affair November 2021 online test-4
- शिक्षण मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, MSME मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या संस्थांनी संयुक्तपणे चालविलेला कार्यक्रम कोमता, ज्याचा उद्देश भारतीय मूल्य प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळण्यांची कल्पना बनविणे आहे
उत्तर :- टॉयकॅथॉन-2021.
- DRDOची पर्यावरण-अनुकूल बायोडायजेस्टर एकक (Mk-II तंत्रज्ञान) सुविधा उपलब्ध करून पाण्याचे संरक्षण आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि _____ एकत्र काम करत आहेत
उत्तर :- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा-मेट्रो).
- हजारो पाळीव पक्ष्यांना H5N8 विषाणूची लागण झाल्यामुळे या राज्यात बर्ड फ्लूला राज्य संकट म्हणून घोषित केले गेले
उत्तर :- केरळ.
- महाराष्ट्रात मराठी पत्रकारिता दिन कोणता दिवस साजरा केला जातो
उत्तर :- 6 जानेवारी 2021.
- बँक ऑफ बडोदा याने ARM-MSME योजनेच्या अंतर्गत MSME उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी _____ सोबत सामंजस्य करार केला
उत्तर :- भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)
- स्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करणारे बँकेचे धोरण, प्रकल्प आणि कार्यक्रमांबद्दल जागृती वाढविण्यासह 2021 या वर्षासाठी प्रथमच ‘शाश्वत विकास बंध’ यांची घोषणा करणारी संस्था
उत्तर :- जागतिक बँक.
- राज्यांचा पहिला गट ज्याने वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने ठरविलेल्या चार नागरिक केंद्रित सुधारणांपैकी तीन (एक राष्ट्र-एक शिधापत्रिका, व्यवसाय सुलभता आणि शहरी स्थानिक संस्था) पूर्ण केल्या
उत्तर :- मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश.
- 100 महिलांची पहिली तुकडी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामध्ये (NDRF) समाविष्ट करण्यात आली असून ____ शहरात गंगा नदीच्या काठी तैनात केली गेली
उत्तर :- उत्तरप्रदेशाचे गढ मुक्तेश्वर.
- सर्वोच्च न्यायालयाने ____ शहरात संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासंबंधी ‘केंद्रीय व्हिस्टा प्रकल्प’ला मान्यता दिली –
उत्तर :- नवी दिल्ली.
- तेलंगणा उच्च न्यायालयाच्या प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण
उत्तर :- न्यायमूर्ती हिमा कोहली.
- भारतीय वंशाचे अमेरिकावासी, ज्यांनी अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
उत्तर :- डॉ. राज अय्यर.
- या संस्थेनी यंदा 30 परिचारीकांना दिला जाणारा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2020’ जाहीर केला
उत्तर :- भारतीय परिचर्या परिषद (INC), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AlFF) प्रथम उप सरचिटणीस कोण
उत्तर :- अभिषेक यादव.
- वर्तमान AlFF सरचिटणीस कोण
उत्तर :- कुशल दास.
- या राज्य सरकारने मृदा, जल परीक्षण करण्यासाठी कृषी क्षेत्रापर्यंत पोहचण्यासाठी ‘कृषी संजीवनी व्हॅन (गाडी)’ तैनात केल्या
उत्तर :- कर्नाटक.
- सर्व घरामध्ये परवडणारे एलईडी दिवे वापरण्यासाठी या राज्य सरकारने ‘फिलामेंट फ्री स्टेट’ प्रकल्प तयार केला
उत्तर :- केरळ.
- 140 किमीपर्यंत मारा करू शकणारे पाकिस्तानचे स्वदेशी विकसित गाइडेड मल्टी लाँच रॉकेट सिस्टम चे नाव काय आहे
उत्तर :- फतह-1
- ही जागा रिकामी करण्यासाठी LAHDC कारगिल आणि भारतीय भुदल यांच्यात सामंजस्य करार झाला
उत्तर :- कारगिल खालचे पठार.
- या सार्वजनिक बँकेनी IITच्या परिसरात ‘फिनटेक इनोव्हेशन सेंटर (FIC)’ याची स्थापना करण्यासाठी FIRST संस्था आणि IIT कानपूर सोबत करार केली
उत्तर :- पंजाब नॅशनल बँक.
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) यांनी दिलेल्या वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) याच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, वास्तविक GDP
उत्तर :- 7.7 टक्क्यांची घट; नाममात्र GDP – 4.2 टक्क्यांची घट.