Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs -Current affair 2021 test Question paper-9
- 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती
उत्तर :- विटोरिओ स्टोरारो (इटलीचे चित्रपट-छायाचित्रकार).
- कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने कलाकारांसाठी “स्ट्रीट थिएटर अँड परफॉर्मिंग आर्ट्स फेलोशिप” योजनेची घोषणा केली
उत्तर :- दिल्ली.
- या ठिकाणी स्वदेशी रचनेच्या अत्याधुनिक ‘चालक रहित मेट्रो कार / रेलगाड्या’ तयार केल्या जात आहेत –
उत्तर :- BEML बंगळुरू कॉम्प्लेक्स.
- _______ देशाचे राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव्ह यांनी आझार मामीन यांना देशाचे पंतप्रधान म्हणून नेमण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली
उत्तर :- कझाकस्तान प्रजासत्ताक
- संपूर्ण देशभरात उद्योजकतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्टार्टअपला आर्थिक मदत देण्यासाठी 1000 कोटी रुपयांची ‘______’ योजना जाहीर केली
उत्तर :- स्टार्टअप इंडिया सीड फंड (बीज निधी).

Current affair November 2021 online test-9
- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा कधी साजरा केला जातो
उत्तर :- 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021.
- संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी ____ जिल्ह्यातल्या करनबेल त्रिपुरी (स्थळ 1) आणि तेवार (स्थळ 2) येथे उत्खनन स्थळांचे उद्घाटन केले
उत्तर :- जिल्हा जबलपुर, मध्यप्रदेश.
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे ______ सर्कल ऑक्टोबर 2020 मध्ये त्रिची, झांसी, मेरठ, हम्पी, रायगंज आणि राजकोट या शहरांतल्या नवीन सर्कलांसह तयार केले गेले
उत्तर :- जबलपूर सर्कल.
- एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) आणि _____ या संस्थांनी देशभरात ‘ऊर्जा कार्यक्षम PNG कुक स्टोव्ह’ (EEPS) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केला
उत्तर :- पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघ (PCRA).
- गोव्यातल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनालिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराचे प्राप्तकर्ता
उत्तर :- विश्वजित चटर्जी.
- कोणत्या राज्यात, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेदीक एरुडाइट फाउंडेशनची ‘वन स्कूल वन IAS’ योजना राबवली जात आहे
उत्तर :- केरळ.
- कोणत्या दिवसा पासून देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा लसीकरण कार्यक्रम जगभरातला सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.
उत्तर :- 16 जानेवारी 2021
- ‘प्रारंभ’ या शीर्षकाखाली दोन दिवस चालणाऱ्या ‘स्टार्टअप इंडिया’ आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला 15 जानेवारी 2021 रोजी ……..सुरुवात झाली.
उत्तर :- नवी दिल्लीत
- केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी (CRPF) तयार केलेली दुचाकी रुग्णवाहिका कोणती
उत्तर :- ‘रक्षिता’.
- देशातले पहिले राज्य, ज्याने मुद्रांक शुल्क प्रक्रियेला कागदरहित करण्याच्या हेतूने डिजिटल ‘ई-मुद्रांक’ सेवा आरंभ केली
उत्तर :- उत्तरप्रदेश
- निर्मल पुरजा आणि मिंगमा ग्यालजे शेर्पा यांच्या नेतृत्वाखाली 10 नेपाळी गिर्यारोहकांच्या चमूने हिवाळा ऋतुत ______ देशातल्या काराकोरम पर्वतराजीच्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या बाजूला असलेले ‘के2’ (8611 मीटर उंची) पर्वतशिखर प्रथमच सर करून इतिहास रचला
उत्तर :- पाकिस्तान
- पुरातत्वशास्त्रज्ञांनी _____ देशात जगातले सर्वात प्राचीन ज्ञात गुहेची भित्तिचित्रे (जंगली डुक्कराचे चित्र) शोधली आहे, जी किमान 45,500 वर्षांपूर्वीची आहेत
उत्तर :- इंडोनेशिया
- _____ या ठिकाणी देशातले पहिले ‘कामगार चळवळ संग्रहालय’ उभारले जाणार आहे
उत्तर :- अलप्पुझा, केरळ.
- भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 1 मार्च 2021 पासून दिल्ली आणि ____ येथे लँडलाईन सेवा प्रदान करण्यास प्रारंभ करणार आहे
उत्तर :- मुंबई.
- खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि आदिवासी कल्याण मंत्रालयाने ____ याची अंमलबजावणी करणारी एक संस्था म्हणून मंत्रालयासोबत भागीदारी करण्याबाबत एक सामंजस्य करार केला
उत्तर :- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP).
- गुवाहाटी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि ____ यांच्यात एक सामंजस्य करार झाला, ज्यामार्फत ईशान्य भारतातली कर्करोग-प्रवण लोकसंख्या ओळखली जाणार आहे
उत्तर :- ईशान्य कर्करोग रुग्णालय व संशोधन संस्था (NECHRI), जोरबात, आसाम.
- अर्थ मंत्रालयाने ____ योजनेसाठी अधिसूचना जाहीर केली, ज्याच्या अंतर्गत प्राप्तिकर प्रकरणात प्रत्यक्ष उपस्थित न राहता डिजिटल माध्यमातून दंडविषयक कारवाईची सोय करण्यासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक केंद्रांची स्थापना केली जाणार
उत्तर :- फेसलेस पेनल्टी योजना.
- देशात प्रथमच, या राज्याच्या गृह विभागाने एक ठराव मंजूर केला, ज्यामुळे तृतीयपंथी समाजातल्या लोकांना पोलीस दलात भरती करता येणार ते राज्य कोणते
उत्तर :- बिहार.
- 20 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 या काळात ‘एयर फोर्स स्टेशन जोधपूर’ येथे होणारी भारत आणि फ्रांस या देशांच्या हवाई दलांची हवाई कवायत
उत्तर :- एक्स-डेझर्ट नाइट-21
- या स्टॉक एक्सचेंजने “StAR MF प्लस” नामक एक मंच तयार केला आहे, जो वितरकांसाठी संपूर्ण समाधान असणार, ग्राहकांना प्रवेश तसेच ई-केवायसीसाठी सक्षम करणार आणि ग्राहक पोर्टफोलिओ व्यवस्थापन उपलब्ध करून देणार
उत्तर :- BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज).