मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत
मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, विशेषतः स्वयंअध्ययन करताना पुढील पद्धत वापरावी
. सर्वप्रथम संदर्भपुस्तकातील एक प्रकरण वाचून संकल्पना समजून घ्यावी, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत, त्यांचे वहीत स्वत: टिपण काढावे, पुन्हा समजून घ्यावे आणि नंतर त्या प्रकरणावरील मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न सोडवावेत.
प्रश्न सोडवितानाच आपल्याला किती समजले आहे, याचा अंदाज येईल. त्यानुसार पुन्हा एकदा त्या दृष्टिकोनातून प्रकरणाचे पुनर्वाचन करावे.
व्याकरण व शब्दसंग्रहाच्या संपूर्ण अभ्यासासाठी मो. रा. वाळंबे लिखित ’सुगम मराठी व्याकरण व लेखन’ हे पुस्तक उत्तम संदर्भ आहे.
वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह हे आपल्याला माहीत आहेच
आपल्या आजच्या वाक्यविचार या घटकासंदर्भात ज्येष्ठ कोशकार वि. वा. भिडे यांचा एक विचार इथे सारांशाने उद्धृत करावासा वाटतो.
ते लिहितात, ‘भाषेतील मूळ शब्दांची रूपे तयार करणे, रूपे तयार झाल्यावर ती वाक्यात मांडणे आणि मनात आलेला विचार मांडण्याची धाटणी या तीन बाबींसंदर्भात भाषेचा जो विशेष असतो तो त्या भाषेचा स्वभाव असतो.
व्याकरणाच्या अभ्यासाने भाषेचा बाह्य स्वभाव कळतो, तर नवीन शब्द तयार करण्याची आणि ते सामावून घेण्याची धाटणी यातून तिचा गूढ स्वभाव समजून घेता येतो.
यानुसार व्याकरणाच्या अभ्यासातून आणि श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, आणि लेखन या भाषाविषयक कौशल्यांच्या अंगिकारातून भाषेच्या दोन्ही स्वभावांची बऱ्याच अंशी उकल होते, असे मला वाटते.
मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत
वाक्य :
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे असते. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे महत्वपूर्ण भाग मानले जातात. जर क्रियापद सकर्मक असेल तर त्या वाक्यातील कर्म हे तिसरा महत्वाचा भाग मानला जातो. या तीन शब्दाबरोबर वाक्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये आणि विधानपूरक इत्यादी शब्द येतात. वाक्यात येणारा प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो. वाक्यातील या शब्दाच्या संबंधातून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो.
सर्वनाम
इंग्रजीवर लक्ष केंद्रित करून हा लेख भाषणाच्या भागाविषयी आहे. प्रकाशन व्यासपीठासाठी, सर्वनाम (प्रकाशन व्यासपीठ) पहा . संगीतकारांसाठी, सर्वनाम (संगीतमय कलाकार) पहा . इतर भाषांमध्ये सर्वनामांसाठी, या प्रविष्टीच्या “हे देखील पहा” विभागात जा.
उदाहरणे
मी तुझ्यावर प्रेम करतो .
त्या स्मरण करून देणारे मला या काहीतरी .
त्याने त्यांच्याकडे पाहिले .
घ्या तो किंवा सोडून तो .
असे कोण म्हणेल?
विशेषण व त्याचे प्रकार (Adjective And It’s Types)
मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌿विशेषण 🌿:
नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
🔻उदा.
चांगली मुले
काळा कुत्रा
पाच टोप्या
⚫️विशेषण – चांगली, काळा, पाच
⚫️विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या
भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात.
या लेखामध्ये आपण वर्णविचार या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या व या संदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्याख्या समजून घेणे व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.