स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द – One word substitutionस्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा शब्दसमूहबद्दल एक शब्द

एका शब्दाच्या प्रतिस्थापनाचा अर्थ असा होतो की एखाद्या विशिष्ट शब्दाचा वापर करून शब्दयुक्त वाक्यांश किंवा वाक्य बदलून ते लहान, संक्षिप्त आणि समजण्यास स्पष्ट केले जाते. अशाप्रकारे, शब्द वाक्याशी एकरूप होतो आणि अशा प्रकारे शब्दयुक्त वाक्यासारखाच अर्थ प्रदान करतो.तसेच, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप महत्वाचे आहे, कारण साधारणपणे परीक्षेत त्याच्याशी संबंधित 2 ते 4 प्रश्न विचारले जातात.शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द – One word substitutionस्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा शब्दसमूहबद्दल एक शब्द

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4
Shabdsamuhabaddal Ek Shabd-4
 • चहाड्या सांगणारा – चहाडखोर
 • चार पायावर चालणारा – चतुष्पाद
 • चांदण्या रात्रीचा पंधरवडा –       शुक्लपक्ष, शुद्धपक्ष
 • चांगले निवडलेले – निवडक
 • चांगल्या कार्यासाठी प्राण देणे – बलिदान
 • चार रस्ते एकत्र मिळतात ती जागा – चौक, चवाठा
 • चारी बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश – बेट
 • चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य- शुंभ 
 • चांगला विचार- सुविचार 
 • चांगल्या गोष्टीचा ठसा- संस्कार 
 • चित्रे काढणारा- चित्रकार
 • चिखलात उगवलेले कमळ- पंकज

 • चित्ताला आकर्जून घेणारा- चित्ताकर्षक, चित्तवेधक
 • चित्रपटात किंवा नाटकात काम करणारी स्त्री – नटी
 • चित्रपटात किंवा नाटकात काम करणारा पुरूष      – नट
 • चित्ताची एकग्रता कशी करावी हे सांगणारे शास्त्र    – योगशास्त्र
 • चैनीत, ख्याली खुशालीत दिवस घालविणारा मनुष्य-          खुशालचंद, खुशालटेकडा
 • चुगल्या सांगणारा       – चुगलीखोर
 • जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
 • जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारे प्राणी –       उभयचर
 • जगाचा स्वामी –         जगन्नाथ
 • जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाल
 • जमिनीखालून जाणारा रस्ता – भुयार

 • जमीनीचे दान- भूदान
 • जहाजांना दिशा दाखविणारा मनोन्यावरील दिवा – दीपस्तंभ
 • जवळचा प्रदेश – परिसर
 • जवळ काहीही नसलेला – अकुंठित
 • जग जिंकणारा – जगज्जेता
 • जगाच्या अंतापर्यंत  – कल्पाती 
 • ज्याचा मोबदला मिळत नाही असा खर्च – बुडितरखर्च
 • जन्मापासून उपजत गुण-जन्मगुण (स्वाभाविक गुणधर्म)
 • जन्म झाला आहे तो देश – जन्मभूमी, मायभूमी
 • जन्मापासून कायमचा दरिद्री      – जन्मदरिद्री
 • जन्मापासून श्रीमंत  – गर्भश्रीमंत 
 • जवळ भांडवल नसता मोठे व्यापारी आहोत असा बहाणा करणारा लहान शेठ – तिरकमशेठ
 • जनावरांच्या खुरांस मारावयाची अर्धवर्तुळाकार लोखंडी पट्टी – नाल
 • जगावर किंवा युद्धात जय मिळविणारा     – फत्तेजंग
 • जहांबाज व कजाग बायको – महामाया
 • जादूच्या सहाय्याने दुसर्‍याच्या शरीरात प्रवेश करणे  – परकायाप्रवेश 
 • ज्याच्यात कोणतेही कर्तृत्व नाही असा  – अजागळ 
 • ज्याने लग्न केले नाही असा  – अविवाहित 
 • ज्याचा आरंभ माहीत नाही  – अनादि
 • जड, बुद्धीहीन, अजागळ मनुष्य – मेषपात्र
 • ज्याचा अपराध नाही तो – निरपराधी

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

 • ज्याला ताळतंत्र नाही असे वर्तन – धांगडधिंगा
 • ज्या स्तंभावर अपराध्याचा वध केला जातो – वधस्तंभ
 • ज्याला बोलता येत नाही असा – मुका
 • ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन  – नापीक 
 • ज्याचा विसर पडणार नाही असा-अविस्मरणीय
 • ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असा –   अनुपम, निरुपम
 • ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
 • ज्याच्यापासून काहीही त्रास होत नाही असा – निरुपद्रवी
 • ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा     – उपकृत
 • जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
 • ज्याचे बरोबर दुस-याची तुलना करता येत नाही असे-         अप्रतिम
 • ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी -पारदर्शक
 • ज्याला खूप माहिती आहे असा – बहुश्रुत
 • ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष-विधुर
 • ज्याच्या हातात चक्र आहे असा -चक्रपाणी, चक्रधारी
 • ज्याला मरण नाही असा -अमर
 • ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे तो – नवकोट नारायण
 • जादूचे खेळ करणारा – जादूगार

 • ज्याला लाज नाही तो – निर्लज्ज
 • ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे असा-सुदर्शनचक्रधारी
 • ज्याला सीमा नाही असा- असीम
 • ज्याचा थांग लागत नाही असा – अथांग
 • ज्याला अंत नाही असा – अनंत
 • ज्याला आधार नाही असा-निराधार
 • ज्याची किंमत करता येणार नाही असे – अमोल, अमूल्य, अनमोल
 • ज्याचा उपाय हमखास लागू पडतो ते औषध – रामबाण
 • ज्याना मुख्यत्वे बुद्धीचा उपयोग करावा लागतो असे लोक
 • बुद्धीजीवी
 • जाणून घेणे अशक्य असे- अज्ञेय
 • ज्याला भीती नाही असा – निर्भय
 • ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा- आजानुबाहू
 • ज्याच्याजवळ अनेक कोटी रूपये आहेत असा     – ककोट्याधीश
 • ज्याच्यापासून बोध घेता येईल असा  – आदर्श 
 • ज्या घराला छप्पर नसून वर चंद्र दिसतो असे मोडकळीस आलेले घर – चंद्रमौळी
 • ज्याच्या बायका एकामागोमाग मरत आहेत असा पुरुष- बाईल खांद्या
 • ज्याला वाळीत टाकला आहे असा  – बहिष्कृत 
 • जिचे डोळे मदिरे प्रमाणे धुंद आहेत अशी  – मदिराक्षी 
 • ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते – गाजरपारखी
 • ज्याच्या तोंडातून ज्वाला निघतात  – ज्वालामुखी 
 • जुन्याची दुरुस्ती  – जीर्णोद्धार 
 • जुन्या मतांना चिटकून राहणारा  – पुराणमतवादी 
 • जिवंत असे पर्यंत – आजन्म (जन्मापासून)
 • जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था –      जिल्हापरिषद
 • जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी- हतभागिनी
 • जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री – सधवा, सुवासिनी
 • जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री – विधवा
 • जिचा उपयोग होत नाही अशी- निरुपयोगी
 • जिवाला जीव देणारा – जिवलग
 • जिची चाल हत्तीच्या पाया प्रमाणे डौलदार आहे अशी  – गजगामिनी 
 • जिथे बसगाड्या थांबतात ते ठिकाण –     बसस्थानक
 • जीव धोक्यात घालण्यासारखे काम – सुळावरची पोळी

 • जीवनातील अंगीकृत कार्य सातत्याने करण्याची जागा (भूमी)- कर्मभूमी
 • जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत-अद्वैत
 • जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय  – इतिकर्तव्यता 
 • जुन्या मतांना व चाली रीतींना चिकटून राहणारा –
 • पुराणमतवादी, सनातनी
 • जे साध्य होणार नाही ते – असाध्य
 • जे नाही ते आहे, असे वाटणे – आभास
 • जेवण झाल्यावर शंभर पावले फिरण्याचा परिपाठ  –  शतपावली
 • जे मिळू शकते असे- उपलब्ध
 • जोरात उसळून बाहेर पडणारी धार – चिरकांडी, चिळकांडी
 • जिचे मुख चंद्राप्रमाणे आहे तशी  – चंद्रमुखी 
 • झाडांचा दाट समूह – झाडी
 • झाडांच्या अंतर्सालीपासून बनविलेले वस्त्र – वल्कल
 • झाडाची वाळलेली पाने – पालापाचोळा
 • टोळासारखे नासाडी करीत उगाच हिंडणारे – टोळभैरव 
 • टिकून राहण्याचा धर्म  – चिकाटी 
 • डोंगरातील अरूंद मार्ग –  डोंगरखिंड 
 • डोंगराच्या माथ्यावरील सपाट प्रदेश – डोंगरपठार 

About Sayli Bhokre

Check Also

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-5

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-5-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply