Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द – One word substitutionस्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा शब्दसमूहबद्दल एक शब्द एका शब्दाच्या प्रतिस्थापनाचा अर्थ असा होतो की एखाद्या विशिष्ट शब्दाचा वापर करून शब्दयुक्त वाक्यांश किंवा वाक्य बदलून ते लहान, संक्षिप्त आणि समजण्यास स्पष्ट केले जाते. अशाप्रकारे, शब्द वाक्याशी एकरूप होतो आणि अशा प्रकारे शब्दयुक्त वाक्यासारखाच अर्थ प्रदान करतो.तसेच, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप महत्वाचे आहे, कारण साधारणपणे परीक्षेत त्याच्याशी संबंधित 2 ते 4 प्रश्न विचारले जातात.शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द – One word substitutionस्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी  शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-2
स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3
  • एकाने दुस-याला सांगून तयार झालेली काल्पनिक गोष्ट –     दंतकथा
  • एका माणसाला एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग – त्रिस्थळीयात्रा, तिरस्थळी
  • एकाच वेळी अनेकजण बोलत असल्यामुळे होणारा आवाज – गलका
  • एखाद्याचे मागून जाणे – अनुगमन
  • एकाएकी होणारा बदल  – क्रांती 
  • एक देश सोडून दुसर्‍या देशात जाणे  – देशांतर 
  • एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा  – शाप 
  • एखाद्या विषयानुरोधाने तात्काळ कविता करणारा- शीघ्र कवी
  • ऐकावयास न येणारा – बहिरा
  • ऐकण्याचे काम करणारा  – श्रोता 
  • ओळख नसलेला- अनोळखी
  • कल्पनाही नसताना     – अकल्पित
  • कल्पना नसताना एकदम आलेले संकट – घाला
  • कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
  • कर्तव्यापासून तोंड फिरविलेला – कर्तव्यपराङ्मुख
  • कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
  • कष्ट करून जगणारा – श्रमजीवी
  • कबड्डीच्या क्रीडांगणावरील मधली महत्तवाची रेषा-          मध्यरेषा
  • कविता करणारा –       कवी
  • कधीही उद्योग न करणारा –       निरुद्योगी
  • कधीही, कशाचीही आठवण न राहणारा – विसरभोळा
  • कधीही मरण नसणारा- अमर
  • कधीही नाश न पावणारा – अविनाशी

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3

  • कर्तव्यात तत्पर असणारा- कर्तव्यपरायण, कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
  • कर्तव्याकडे पाठ फिरविणारा     – कर्तव्यपराङ्मुख
  • कमळाप्रमाणे डोळे असणारी – कमलाक्षी, कमलनयना
  • कधीही विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय
  • कवितेची रचना करणारी – कवयित्री
  • कलेची आवड असणारा – कलाप्रेमी, कलासक्त, रसिक, कलाकार
  • कसलेही व्यसन नसणारा – निर्व्यसनी
  • कसलाही डाग (काळिमा) नसणारा – निष्कलंक
  • कसलीही तक्रार न करता –       बिनतक्रार
  • कमी बुद्धी असलेला – मतिमंद
  • कमालीचा मूर्ख- मूर्ख शिरोमणी
  • कष्ट न करता सहज रीतीने मिळणारी       – सहजसाध्य
  • कष्टाने मिळणारी-        कष्टसाध्य
  • कमी आयुष्य असलेला – अल्पायुषी, अल्पायु
  • कधीही न विटणारे कशाचीही अपेक्षा नसणे – अवीट
  • कपटी व कृष्ण कारस्थाने करणारा मनुष्य – शकुनी मामा 
  • कठोर हृदय असणारी व्यक्ती     – पाषाणहृदयी
  • कवितेच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारा चरण -पालुपद कर्तृत्वशून्य व भेकड असा मनुष्य- दळूबाई
  • कधी न बदलणारे वाक्य- दगडावरची रेघ
  • कड्यावरून लोटण्याची शिक्षा- कडेलोट

  • कंटाळवाणे लांबलचक भाषण – एरंडाचे गु-हाळ
  • कंठ दाटून आल्यावर जो मुखरस गिळतात तो  – आवंढा
  • कसलाही अडथळा नसलेला     – अकुंठित
  • कमी वेळ टिकणारा –  अल्पजीवी
  • काचेच्या बांगड्या करणारा – कासार
  • काही ही कष्ट न करता आयते बसून खाणारा- ऐतखाऊ
  • काम साधून घेण्यापुरते गोड बोलणारा- कामापुरता मामा
  • कानाना गोड वाटणारा- कर्णमधुर
  • कार्य करण्याची जागा- कर्मभूमी
  • कार्यात तत्पर असलेला- कार्यक्षम, कार्यतत्पर
  • काम करण्यात कुचराई (टाळाटाळ) करणारा -कामचुकार
  • काळजात कालवा कालव झाल्यासारखे वाटणे- गलबलणे
  • कार्यक्रम पाहण्यास आलेले लोक- प्रेक्षक
  • कायमचे आठवणीत राहणे- रूजणे
  • कायम टिकणारे- शाश्वत
  • काहीही सहन करण्याचे सामर्थ्य- सहनशीलता
  • काटकसरीने खर्च करणारा- मितव्ययी
  • कादंबरी लिहिणारा      – कादंबरीकार

  • किल्ल्याच्या भोवतालची भिंत- तट
  • कीर्तन करणारा- कीर्तनकार
  • कुस्ती खेळण्याची जागा- हौदा, आस्वाडा
  • कुळातील पूजेची देवता- कुलदेवता
  • कुळाला तेज प्राप्त करून देणारा- कुलदीप
  • कुणाला दाद न देणारा- वस्ताद
  • कुरूप अशी स्त्री- शूर्पणखा, हिडिंबा
  • कुंजात विहार करणारा – कुंजविहारी
  • केवळ शोभेची आयते खाऊ मंडळी – भोजनभाऊ
  • कैदी ठेवण्याची जागा- कारागृह, कारा, बंदिशाळा, तुरुंग
  • कोणाच्याही पक्षात सामील न होणारा      – अपक्ष
  • कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा -निःपक्षपाती, निष्पक्षपाती
  • कोणालाही कळू न देता – बिनबोभाट
  • कोणतेही काम करणारा- हरकाम्या
  • कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो- स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी, स्थिरमती
  • कोणत्याही क्षेत्रात सर्वांगाने घडून येणारा बदल –    क्रांती
  • कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता सेवा करणा -निःस्वार्थी
  • कोणताही आधार नसलेला – अनाथ, निराधार
  • कोणतेही काम करण्याचा कंटाळा करणारा- आळशी
  • कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्य- अजागळ

  • कोणीही भोळा मनुष्य – भोळासांब
  • कोणतीही योजना  आखणारा- योजक
  • कोणत्याही गोष्टीची आवड असलेला- रसिक
  • कोणत्याही विषयावर जो भाषण करतो तो- वक्ता
  • खाद्य पेयाचे नियमाने ठरेलेले प्रमाण- रतीब
  • खूप विस्तार असलेले- विस्तीर्ण
  • खूप आयुष्य असलेला- दीर्घायुषी, चिरंजीव
  • खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  • खूप जोरात किंवा एकसारखे टाळ्या वाजविणे- टाळ्यांचा कडकडाट
  • खूप उंच उंच असे आकाश –     अंतराळ
  • खेळातील दोन डावांच्या मधला विसाव्याचा वेळ –            मध्यंतर
  • खेळांडूच्या संघाचा प्रमुख- कर्णधार
  • खोटी तक्रार करणारा’ कांगावखोर, कागाळखोर
  • गावची न्याय निवाड्याची जागा – चावडी
  • गावची कामकाजाची जागा       – चावडी
  • गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा    – पाणवठा
  • गाई सांभाळणारा –      गोपाळ
  • गावच्या पंचांचा कारभार असणारी संस्था- ग्रामपंचायत
  • गावाभोवतालचा तट – गावकुस
  • गाईसाठी काढून ठेवलेला घास- गोग्रास
  • गावाचा कारभार –      गावगाडा
  • गावातून किंवा शेतातून जणारी लहान वाट – पाणंदी
  • गाणे गाणारा – गायक
  • गुरूकडे आपल्या बरोबर शिकणारा- गुरुबंधू

  • गोल गोल फिरणारा जोराचा वारा – वावटळ
  • गोष्टी लिहिणारा – कथालेखक
  • गोकुळाष्टमीच्या शेवटी होणारा वेळ व प्रसाद- गोपाळकाला
  • गोल आकाराचा घडवलेला एक दगड – सहाण
  • घरी पाहुणा म्हणून आलेला       – अतिथी
  • घरातील मजले दालन – माजघर
  • घरदार नसलेला – उपन्या, उपरा, (हक्क नसलेला)
  • घोडे बांधण्याची जागा – तबेला, पागा
  • घोडयाच्या जबड्यात अडकविलेली लोखंडी साखळी- लगाम
  • चरित्र लिहिणारा -चरित्रकार

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-5

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-5-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply