मराठी व्याकरण भाषेतील रस
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
मराठी व्याकरण भाषेतील रस रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आप fbणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.
🌿१) स्थायीभाव – रती
रसनिर्मिती – शृंगार
हा रस कुठे आढळतो – स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा –
डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.
🌿२) स्थायीभाव – उत्साह
रसनिर्मिती – वीर
हा रस कुळे आढळतो – पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा.
‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’
🌿३) स्थायीभाव –शोक
रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो – दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा –
आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!
मराठी व्याकरण भाषेतील रस
🌿४) स्थायीभाव – क्रोध
रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा –
मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.
🌿५) स्थायीभाव – हास
रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो – विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा –
मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.
🌿६) स्थायीभाव – भय
रसनिर्मिती- भयानक
हा रस कुळे आढळतो – युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा.
तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.
मराठी व्याकरण भाषेतील रस
🌿७) स्थायीभाव – जुगुप्सा
रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो – किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा –
मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.
🌿८) स्थायीभाव – विस्मय
रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो – आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा –
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
🌿९) स्थायीभाव – शम (शांती)
रसनिर्मिती – शांत
हा रस कुळे आढळतो – परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा –
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !