मराठी व्याकरण कथालेखन व गद्यआकलन दिलेला गद्य उतारा वाचून त्यातील मुख्य व महत्त्वाचा विचार किंवा विषय समजून घेणे म्हणजे उताऱ्याचे आकलन होय.
मराठी व्याकरण कथालेखन व गद्यआकलन
एखाद्या पुस्तकातील उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्याचे आकलन झाले की त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात.
दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. त्यातील माहिती बारकाईने समजून घ्यावी. उताऱ्यात कोणते तत्त्व किंवा विचार पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जाणून घ्यावे.
दिलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची उत्तरे उताऱ्यातून शोधून काढून स्वतःच्या शब्दांत लिहावीत.
ती उत्तरे लिहिताना उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी उतरवून काढू नयेत. दीर्घ व आलंकारिक वाक्यरचना करू नये
. सोप्या शब्दांत आणि सुटसुटीत वाक्यांत उत्तरे लिहावीत.
🌿कथालेखन🌿
मुद्यांवरून कथालेखन
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजे कथालेखन होय.
एखादी घडलेली घटना किंवा प्रसंग आकर्षकरितीने कथारूपाने सांगणे म्हणजे कथालेखन.
मनोरंजक कथा सर्वांना वाचावीशी आणि ऐकवीशी वाटते. कथेचा प्रारंभ उत्सुकता वाढविणारा असावा.
कथेमध्ये रंजकता असावी. कथेत कल्पनेतून मांडलेले प्रसंग व घटना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, असे वाचकाला वाटले पाहिजे.
कथेची भाषा साधी, सोपी व चटकन समजणारी असावी. कथा बोधप्रद असावी.
कथेमध्ये रंजकता असावी. कथेत कल्पनेतून मांडलेले प्रसंग व घटना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, असे वाचकाला वाटले पाहिजे.
कथेची भाषा साधी, सोपी व चटकन समजणारी असावी. कथा बोधप्रद असावी.
कथालेखन हा प्रकार लिहिण्यास सोपा आहे. या प्रकारात कथेतील मुख्य घटना, सुरुवात व शेवट मुद्द्यांच्या आधारे सांगितलेला असतो.
त्या मुद्द्यांच्या आधारे कथा खुलवायची असते. कथेतील भाषा ओघवती असावी व पाल्हाळीक नसावी
कथालेखन करताना काही मुद्दे –
सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.
कथेतून जो बोध द्यायचा आहे ती मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी.
कथेतील वर्णन भूतकाळात लिहावे.
आकर्षक पद्धतीने कथेचा प्रारंभ करावा.
आवश्यक असेल तेथे संवादांचा वापर करावा. संवादांत योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करावा.
तीन-चार परिच्छेदांत कथालेखन करावे.
कथेतील घटनेनुसार कथेस समर्पक शीर्षक द्यावे. तात्पर्य लिहिले तर समारोप परिणामकारक ठरतो.