मराठी व्याकरण पत्रलेखन Marathi Vyakaran Patralekhanआज जग जवळ आले आहे. म्हणजे जगात दूरवर असलेल्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग आज उपलब्ध आहेत. उदा. दूरध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी. तरीपण आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. पत्राच्या माध्यमातून आपण आपले मन दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकतो. म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे.
मराठी व्याकरण पत्रलेखन Marathi Vyakaran Patralekhan
पत्राचे मुख्य २ प्रकार :
१) कौटुंबिक / घरगुती पत्र
२) व्यावसायिक पत्र
) कौटुंबिक / घरगुती पत्रे
काही गोष्टी लक्षात घ्यावात –
१. पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख घालावी.
२. पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.
३. पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
४. पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आईवडिलांना ‘शिरसाष्टांग नमस्कार’ किंवा ‘शि.सा. नमस्कार’ आणि कुटुंबातील इतरांना सा.न. / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.
५. समारोपाचा योग्य मायना असावा. पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.
२) व्यावसायिक पत्र
१. व्यावसायिक पत्रात, पत्राच्या वरच्या भागात ‘।।श्री।।’ वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही.
२. पत्राची सुरुवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.
३. पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.
४. त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तोसुद्धा लिहावा.
५. योग्य, नेटक्या शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.
६. ‘आपला विश्वासू’ ‘आपला कृपाभिलाषी’ या शब्दांनी शेवट करून स्वाक्षरी करावी.