मराठी व्याकरण शब्दांच्या जाती माहिती पुढीलप्रमाणे
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 2
बदक पाण्यात पोहते’ हे वाक्य आहे.
या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे.
‘पाणी’ हा शब्द आहे.
‘पाण्यात’ हे पद आहे.
🌺पाणी’ हा शब्द आहे.🌺
‘पाण्यात’ हे पद आहे.
वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने ‘शब्द’ असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ:-
‘स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती‘ आहे. मूळ शब्दाला व्याकरणात ‘प्रकृती‘ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे जे रुप झाले त्याला ‘विकृती’ असे म्हणतात.
विकृती म्हणजे शब्दांच्या मूळ रुपाचे बदललेले रुप. यालाच ‘पद’ असे म्हणतात.
वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते.
🌺शब्दांच्या जाती🌺
शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.
बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात.
शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो.
क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही.
विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात.
शब्दाचा जाती
🌷🌷शब्दांच्या जाती- 🌷🌷
१.नाम
वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ
फूल, हरी, गोडी इत्यादी
🌿नाम🌿
🌷🌷२.सर्वनाम🌷🌷
जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ
मी, तू, हा, जो, कोण इत्यादी
🌿सर्वनाम🌿
🌷🌷३. विशेषण🌷🌷
जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
कडू, गोड, दहा, त्याचा इत्यादी.
🌿विशेषण🌿
🌷🌷४. क्रियापद🌷🌷
जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ
बसतो, जाईल, आहे इत्यादी
🌿क्रियापद🌿
५. क्रियाविशेषण
जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
आज, काल, तिथे, फार इत्यादी
🌿क्रियाविशेषण🌿
६ शब्दयोगी अव्यव
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ
झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी इत्यादी
🌷🌷७. उभयान्वयी अव्यय🌷🌷
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ
व, आणि, परंतु, म्हणून इत्यादी
🌿उभयान्वी अव्यव 🌿
🌷🌷८. केवलप्रयोगी अव्यय🌷🌷
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ
शाब्बास, अबब, अरेरे इत्यादी
🌿 केवलप्रयोगी अव्यव🌿
सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा Marathi Vyakaran
- 11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 6 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 5 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 4 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
- 1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
- Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी:2 Jan 2022
- Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी 2021
- चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-1 (स्पष्टीकरणासहित)
All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now