मराठी व्याकरण विरामचिन्हे

मराठी व्याकरण विरामचिन्हे

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

मराठी व्याकरण विरामचिन्हे विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात.       

जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.           

विरामचिन्ह

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.          

आपण संभाषण करताना/बोलताना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो ज्या चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.           

विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.        

विरामचिन्हचे प्रकार पुढीलप्रमाणे :-          

१) पूर्णविराम (.)

२) अर्धविराम (;)

३) स्वल्पविराम (,)

४) अपूर्णविराम (:)

५) प्रश्नचिन्ह (?)

६) उद्गारवाचक (!)

७) अवतरणचिन्ह (“-“)

८) संयोगचिन्ह (-)

९) अपसरणचिन्ह (_)

१०) विकल्प चिन्ह (/)    

विरामचिन्ह प्रकार

🌷पूर्णविराम (.) :-  🌷          

वाक्य पूर्ण झाल्यावर हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात.         

उदा.     

काजल शाळेत चालली.          

पूर्णविराम

🌷🌷अर्धविराम (;) :-    🌷🌷      

दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना या चिन्हाचा वापर करतात.       

ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात. संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.                  

उदा.

मी तिला कॅाल केला ; पण तिने उचला नाही.

🌿अर्ध विराम🌿

🌷🌷स्वल्पविराम (,) :-   🌷🌷         

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास प्रत्येक शब्दाच्या पुढे या चिन्हाचा वापर करतात.  

वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी, मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी, समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता. वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो. एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.   

उदा.    

१. जेवायला डाळ, भात, भाजी केली आहे.

२. आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपिप्रकार पहिले. 

🌿स्वल्पविराम🌿

🌷🌷अपूर्णविराम (:) :-    🌷🌷

वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तेव्हा या चिन्हाचा वापर होतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. 

उदा.

हा पदार्थ करण्याच्या तीन पद्धती आहेत : उकडून, तळून, भाजून. 

🌿अर्धंविराम🌿

🌷🌷प्रश्नचिन्ह (?) :- 🌷🌷 

याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो. वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. प्रश्न विचारताना या चिन्हाचा वापर करतात. 

उदा. 

१. तुम्ही जेवलात का ?

२. रमाची परीक्षा कधी आहे? 

३. सुरेशचे लग्न कधी होणार? 

🌿प्रशचिन्ह🌿

🌷🌷उद्गारवाचक (!) :- 🌷🌷

मनातील उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी या चिन्हाचा वापर करतात. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.           

उदा. 

१. शाब्बास, असाच अभ्यास कर!          

२. छान, हीच खरी देशसेवा आहे!         

३. अरे वा ! किती सुंदर दिसतेस तू.               

🌿उद्गाररवाचक🌿

अवतरणचिन्ह (“-“) :-     

बोलणाऱ्याचे उद्गार जसेच्या तसे देताना या चिन्हाचा वापर करतात. एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘  ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.             

एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता ” ” दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.               

उदा.      

१. तो म्हणाला, “मी शाळेत येईन”.       

२. अहमदनगर हे ‘ऐतिहासिक’ शहर आहे.      

     🌿अवतरणचिन्ह🌿

संयोगचिन्ह (-) :-       

दोन शब्द जोडताना व ओळ संपल्यावर शब्द अपुरे राहिल्यास या चिन्हाचा वापर करतात.           

उदा.          

१. प्रेम-विवाह         

२. रिक्षा-टॅक्सी     

   🌿 संयोगचिन्ह    🌿

अपसरणचिन्ह (_) :-           

बोलताना विचारमाला तुटल्यास व स्पष्टीकरण द्यायचे असल्यास या चिन्हाचा वापर करतात.       

उदा.              

मी त्याला सांगितले होते पण_   

        🌿अपसरण चिन्ह🌿

🌷🌷विकल्प चिन्ह (/) :-   🌷🌷     

एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.            

उदा.             

मी बस/रिक्षाने घरी जाईन.

🌿विकल्प चिन्ह🌿

सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा Marathi Vyakaran

All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply