MPSC च्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिध्द झाल्या नसल्याने, उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मा.मंत्रिमंडळाच्या दि. १० नोव्हेंबर, २०२१ च्या बैठकीत झाली. त्यानुसार अशी संधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
MPSC च्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी.
१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात दि.१ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत, शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.
२) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.
(३) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही. अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने “एक वेळची विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download