मराठी व्याकरण – अलंकार माहिती
मराठी व्याकरण – अलंकार माहिती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
मराठी व्याकरण – अलंकार माहिती अलंकार म्हणजे दागीणे होय कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही.
🌷अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात.
🌷शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात.
🌷विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘
🌷मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते.
🌷यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.
🌷पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो.
🌷पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
🌷अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.
अलंकार म्हणजे दागीणे होय
Railway Exam Practice Question Set
कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही.
🌿शब्दालंकार
🌿अर्थालंकार
यमक
कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.
उदा :
🔷जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ
🔷पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔻पुष्ययमक🔻
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
❇️दामयमक❇️
🔹आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला
🔹पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
🔹तल्लिले मधि तल्लीन न हो कल्लोलिनी! कवी कवण तरी?
जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
श्लेष
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा :
🌿सूर्य उगवला झाडीत…
झाडूवाली रस्ता झाडीत…
शिपाइ गोळ्या झाडीत…
अन् वाघहि तंगड्या झाडीत…
🌿राम गणेश गडकरीकृत हे एक “झाडीत” या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌿अर्थश्लेष🌿
वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा :
🔹तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच
🌸सभंग श्लेष🌸
उदा :
🔹श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
🔹कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
🔹ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले