संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 15 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 15
- फुल ना फुलाची पाकळी – वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे
- फुटका डोळा काजळाने साजरा करावा – आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा
- फासा त्याचा मासा – जो प्रयत्न करतो त्याला यश मिळते
- फुकटाच खाय त्याले स्वस्त महाग काय – फुकट भेटले तर यथेच्छ ताव मारणे
- फुटले जाते ,तुटले नाते – एकदा मनाचा बिघाड झाला तर तो सुधारता येत नाही
- फिरेल फाळ तर जाईल काळ – मशागत चांगली केली तर भरपूर पीक येते
- फुकट जेऊ तर बापलेक येऊ – फुकटचे मिळाले तर खूप खायचे
- फुकटाची कढी अन् धावू धावू वाढी – फुकटाच मिळाल त्याची धूळधाणी करणे
- फुलाचा वास भुंग्याला आणि चिखल बेडकाला – ज्याच्या त्याच्या नशिबा प्रमाणे ज्याला त्याला मिळते
- बडा घर पोकळ वासा- दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव
- बळी तो कान पिळी – बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो
- बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना – निरुपयोगी गोष्ट
- बाप से बेटा सवाई – वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार
- बाप तसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे
- बावळी मुद्रा देवळी निद्रा – दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस
- जारात तुरी भट भटणीला मारी – काल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे
- बारक्या फणसाला म्हैस राखण – ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे
- बुडत्याला काडीचा आधार – घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते
- बैल गेला आणि झोपा केला – एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते
- बोलेल तो करेल काय – केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही
- बोडकी आली व केस कर झाली – विधवा आली अन लग्न लावून गेली
- बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल – तुमच्या म्हणण्याला प्रत्यक्ष आधार दाखवा नाही तर हार पत्कर.
- बाप ठाऊक आईला पाप ठाऊक मनाला – मनच पाप जानत जस पुत्राचा बाप कोण हे फक्त आईलाच माहीत असते
- बापाला बा म्हणेना तो चालत्याला काका कोठून म्हणेल – जो आपल्या आई वडिलांचा आदर करत नाही तो इतरांची पर्वा काय करेल
- बाहेरून काटे पन आत गोड साटे – वरुण जो गृहस्थ कठोर असतो त्याचे मन मोहित असते
- बांध न शेताला,पीक ना लागे हाताला – शेताला बांध नसेल तर पीक येणार नाही
- बाबा वाक्यं प्रमाणम् – थोर माणसांचा शब्द प्रमाण मानला जातो.
- बावळी मुद्रा देवळी निद्रा – दिसण्यात बावळट पण व्यवहारचतुर.
- बुडत्याचा पाय खोलात – अवनतीच्या काळात वाईट गोष्टींकडे आपोआप प्रवृत्ती होणे.
- बुडत्याला काडीचा आधार – घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेले थोडेसे साहाय्यदेखील महत्त्वाचे वाटते.
- बोलाचीच कढी, बोलाचाच भात – नुसते बोलून गार करून वाटेला लावणे.
- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले – बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला मान द्यावा.
- बहिऱ्या पुढे भाषण व आंधळ्या पुढे दर्पण – सर्व गोष्टी व्यर्थ होत
- बा चा बा मेला नी बोंबलता ओठ गेला – दोन्हीकडून नुकसान
- बाजार भरण्यापूर्वीच चोराची तयारी – काम सुरू होण्यापूर्वीच फळाची आशा
- बायको ना बिर्हाड, चोराला बांधला शिराड – ज्याला बायका पोर नाही असा मनुष्य
- बारा पिंपळांवरचा मुंजा – एका जागी स्थिर न राहणारा
- बारा रेडे धुईन पण एक शालिग्राम धुणार नाही – चांगल्या कामाची आवड नाही पण वाईट कामासाठी सदा तयार
- बारा वर्षे तप केले बुवापाशी पारणे फेडले – बराच काळ चांगलीच कामे करायची पण शेवटी वाईट काम करणारा
- बारा वर्स तप केल ,गावोगावी पाप केल – पाप पुण्याची वजाबाकी
- बुडत्या घरचा तरता वासा – जेव्हा सर्वनाश होऊ लागतो तेव्हा जेवढे वाचवता येईल तेवढे वाचवावे
- बुवा गयावळ आणि बाई चंद्रावळ – भिन्न प्रवृत्तीची पती पत्नी
- बार भाई चा शेती काय लागेल हाती – एखाद्या गोष्टीमध्ये गरजेपेक्षा अधिक लोक सहभागी झाले तर ती गोष्ट नीट होत नाही
- बोलाचीच कढी बोलाचाच भात – सगळ्यांना बोलून खुश करणे पण प्रत्यक्षात कोणतीही कृती न करणे
- भरवशाच्या म्हशीला टोणगा – खूप आशा वाटणाऱ्या बाबतीत संपूर्ण निराशा.
- भुकेचे कोल्हे, काकडीला राजी – पोटात भूक मावत नसली, तर काहीही खाल्ले जाते.
- भुकेला कोंडा, निजेला धोंडा – अडचणी वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची तयारी असणे
- भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी – एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो
- भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री- व्यक्ती काही कारण नसताना भीत असते
- भिंतीला कान असतात – गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा