संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 3 Marathi Mhani ani Wakprachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shbdsangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 3
- आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
- आधी शिदोरी मग जेजूरी- आधी भोजन मग देवपूजा
- आचार भ्रष्टी सदा कष्टी – ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
- आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
- आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते – अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी असणार्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे
- आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
- आलीया भोगाशी असावे सादर – कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
- आवळा देऊन कोहळा काढणे – क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
- आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
- आईचा काळ बायकोचा मवाळ -आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
- आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली – अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
- आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे.
- आलिया भोगासी असावे सादर – तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
- आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही – अनुभवाशिवाय शहाणपण नसते.
- आधीच तारे, त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
- आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान- अडाण्या माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितां सारखा वागतो
- आंधळे दळते कुत्रं पीठ खाते – एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – आपल्या जवळ मुळीच काही नसेल तर दैवाला अल्पसे मागतो पण देव अधिक देतो
- आंधळ्या बहीर्याची गाठ – एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन माणसांची गाठ पडणे
- आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणे – फक्त स्वतः चाच फायदा करून घेणे
- इच्छा तेथे मार्ग – एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
- इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीची
- इच्छा परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे
- इन मीन साडेतीन – एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
- इच्छा तसे फळ – जशी इच्छा असते तसे फळ मिळते
- ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेण बांधतो – जन्मास आलेल्यांचे पालनपोषण होतेच
- उठता लाथ बसता बुकी – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
- उडत्या पाखरची पिसे मोजणे – अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
- उधारीचे पोते सव्वाहात रिते – उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
Free Job alert App