संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 4

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 4 Marathi Mhani ani Wakprachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shbdsangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 4

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 4

  • उंदराला मांजर साक्ष – वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
  • उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी  – प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमते नुसार काम करतो 
  • उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता बोलणे.
  • उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार – थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
  • उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
  • उसाच्या पोटी कापूस  – सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती 
  • ऊस गोड पण मुळ्या सोड  – परोपकारी माणसाला फार छळू नये 
  • उतावळी बावरी (नवरी) म्हातार्‍याची नवरी – अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
  • उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी – जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
  • उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? – एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
  • उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? – जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
  • उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
  • उपट सूळ घे खांद्यावर – नसते लचांड पाठीमागे लावून घेणे
  • उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे  – श्रीमंत माणसाची खुशामत करणारे गोळा होत असतात 
  • एक ना घड भारभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे 
  • करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
  • एक घाव दोन तुकडे  – एका झटक्याने वादग्रस्त गोष्टीचा निकाल 
  • एक पंथ दो काज  – एकाच मार्गावरची दोन कामे ही एकाच खेपेत करणे 
  • एक से भले दो – एकापेक्षा दोघे बरे 
  • एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
  • एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
  • एका कानाने ऐकावे दुसर्‍या कानाने सोडून द्यावे  – एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी 
  • एक नाही दोन नाही  – पूर्ण शांतता 
  • एकटा जीव सदाशिव  – एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते तो चैनीत दिवस घालवतो 
  • एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात  – दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणारा 
  • एक भाकरी सोळा नारी  – एका जागेसाठी अनेकांचा दावा 
  • एकादशीच्या दिवशी शिवरात्र येणे  – संकटात आणखी संकटे येणे 
  • ऐकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.

Free Job Alert App

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply