संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 16 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021- MPSC
- अगं अगं म्हशी मला कोठे नेशी – स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
- अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया – स्वतः स्वतःचे ही संरक्षण करू न शकणे
- आपला हात जगन्नाथ- आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
- असतील शिते तर जमतील भूते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात
- अभ्यासाचे दप्तर जड – कामापेक्षा दगदग जास्त
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो
- अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते
- अतिशहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही
- अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो
- अति झाले आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की दुःखदायी ठरते
- अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे – दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
- अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा