संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 13

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 13 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 13

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 13

  • धड ना संसार,  नि धड ना तप- सर्व अर्धवट काम 
  • धड दिसेना नि मन बसेना  – वस्तू जर चांगली नसेल तर तिच्याबद्दल आवड उत्पन्न होत नाही 
  • धरले तर चावते,  सोडले तर पळते  – काहीच उपयोगाचे नसणे 
  • धर्माची डाळ म्हणून पाखडून  घाल  – दानात मिळालेली वस्तू पाहूनच उपयोगात आणावी 
  • धनाची करी माया  उडत्या पाखराची छाया  – पैसा आज आहे उद्या नाही 
  • धन्याचे हाल, कुत्रे पडले लाल  – मालकापेक्षा दिवाणजीच गब्बर 
  • धीर धरील तो खीर खाईल  – जो भला मनुष्य असतो त्याचाच शेवटी फायदा होतो 
  • ध्वनी तसा प्रतिध्वनी  – जशी क्रिया तशी प्रतिक्रिया 
  • धर टाक की लाव कागदाला  – भरमसाठ वाटेल ते लिहणे 
  • धन दुपारची सावली आहे  – पैसा फार थोडा काळ टिकतो 
  • धान्य तेथे घुशी  – जेथे द्रव्य असते तेथे लोभी लोक जमतात 
  • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने – दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात
  • नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये – नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.
  • न कर्त्याचा वार शनिवार – एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो
  • नव्याचे नऊ दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
  • नळी फुंकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे – केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे
  • नवी विटी नवे राज्य- सगळीच परिस्थिती नवीन बसणे 
  • नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे
  • नाव मोठ लक्षण खोट  – बाह्य देखावा आकर्षक पण कृतीच्या नावाने मात्र शून्य 
  • नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा – नाव मोठे लक्षण खोटे.
  • नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे – देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.
  • नाक दाबले, की तोंड उघडते – एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.
  • नागव्यापाशी उघडा गेला, रात्रभर थंडीने मेला – आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.
  • नागिन पोसली आणि पोसणाराला डसली – वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच
  • नाचता येईना अंगण वाकडे – आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे
  • नावडतीचे मीठ आळणी – आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते
  • निंदकाचे घर असावे शेजारी – निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात
  • नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन – अतिशय हटवादीपणाची वर्तन करणे
  • नकटा तो नकटा, पण घी तो चट्टा  – कुरूप असला तरी भरपूर खाण्यास लागणारा
  • नऊ कारभारी अठरा चौधरी  – अनेक मालक जिथे असतात तिथे अनागोंदी कारभार असतो 
  • नंदी आला घरी,  त्याचा आदर करा  – पाहुणा जरी नको असला तरी त्याचेही स्वागत करावेच लागते 
  • नजर गेली शेजारी  ,लक्ष उडाले संसारी – घरच्या पेक्षा बाहेरच अधिक लक्ष असणे 
  • नकटे रहावे पण धाकटे राहू नये  – शरीरात काही व्यंग असल्यास चालते पण धाकटे राहू नये. कारण धाकट्या ची प्रतिष्ठा कमी असते 
  • नखभर सुख हातभर दुःख  – जगात सुख फार कमी असते, दुःखच अधिक असते 
  • नवा मनू नवा धनू  – सुधारलेला काळ आणि सुधारलेली हत्यारे 
  • नवे ते हवे – नवीन वस्तू प्रत्येकालाच आवडते 
  • नाक खाजवले आणि नकटे वरमले  – चांगल्या दृष्टीने जरी एखादी गोष्ट म्हटली तरी ती वाईट आहे असे समजणे 
  • नाजूक नार तिला चाबकाचा मार  – ढोंगी माणसाला चाबकाचाच मार द्यायला हवा 
  • नाकाने कांदे सोलणे  – अधिक बढाया मारणे 
  • नात तशी पोती  – माणूस आपल्या परंपरेच्या वळणावर जातो 
  • नारळही पाहिजे आणि खोबरेही पाहिजे  – दोन्हीकडून फायदा झाला पाहिजे 
  • नार्‍या नागविला न तुक्या उजविला  – एका सत्कर्माने दुसर्‍या दुष्कर्माचा नाश 
  • नार्‍या जाणे बारा तर कोशा जाणे साडेतेरा  – एकाहून एक श्रेष्ठ 
  • नाव अन्नपूर्णा, टोपल्यात भाकर उरेना- नाव मोठे लक्षण खोटे 
  • नाही निर्मळ जीवन काय करील साबण  – जेथे मनच स्वच्छ नाही तेथे साबण काय करणार 
  • निश्चयाचे बळ | तुका म्हणे तेची फळ  – जर निश्चय पक्का असेल तर फळ निश्चित असते 
  • नित्य मरे त्याला कोण रडे  – तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही 
  • नेसायला आरेसे , पुरायला पैसे  – फाटकी वस्त्रे नेसायची पण गाठीला द्रव्य ठेवायचे 
  • नेहमीचा पाहुणा तो तिसर्‍या दिवशी दिवाणा  – अधिक दिवस राहणार्‍या पाहुण्याचा मान राहत नाही 
  • पळसाला पाने तीनच – सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply