संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 14 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 14
- पडलेले शेण माती घेऊन उठते – एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच
- पदरी पडले पवित्र झाले – कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कितीला नाव ठेवणे उपयोगाचे नसते
- पायाची वाहन पायीच बरी – मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो.
- पाचामुखी परमेश्वर – बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे
- पाप आढ्यावर बोंबलते – पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही
- पाची बोटे सारखी नसतात – सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात
- पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम – जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो
- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे -अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही
- पी हळद नि हो गोरी -कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे
- पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली – फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे
- पुढच्याच ठेच मागचा शहाणा – दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो
- पुढे तिखट मागे पोचट – दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे
- पुढे पाठ मागे सपाट – पुढे वाचत जाणे पण मागचे वाचलेले विसरत जाणे
- पोटभर अन्न अंगभर वस्त्र – उदरनिर्वाहास आवश्यक वस्तू
- पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा – पैसा कमी काम जास्त
- पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी – स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे
- पोर होईल ना व सवत साहिना – आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही
- पोटचे द्यावे पण पाटचे देऊ नये – आपल्या मुलापेक्षा आश्रयास असलेल्या मुलावर अधिक प्रेम करणे
- पालथ्या घागरीवर पाणी – केलेला उपदेश निष्फळ जाणे
- पुराणातील वांगे पुराणात – एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे
- पोटात शुळ उठणे – मत्सर वाटणे
- पिकते तेथे विकत नाही – निर्मितीच्या ठिकाणी मूल्यवान नसते
- पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर – श्रध्दा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही
- पडेल पूस तर लावा ऊस- पुनर्वसू नक्षत्राचा पाऊस पडताच ऊसाची लावणी करावी
- पांढरा परीस नर्मदा गणेश – वरुन सुंदर आतून कुरूप
- पावसाची ओल जाऊ द्या खोल – पावसाचे पाणी खोलवर जाऊ द्यायला हवे
- पावला तर देव नाहीतर धोंडा – ज्या कामापासून जमला तर फायदा नाहीतर नुकसान
- पिकास द्या कोळपणी दिले जाते अर्थपाणी – कोळपणी दिल्यास ओल टिकून राहते
- पीक थी भीक – जिथे पीक तिथे भीक
- पीठ आहे तर मीठ नाही ,मीठ आहे तर पीठ नाही – नेहमी काही ना काही उणीव असतेच
- पुरुषाचे पीठ पैसा तुटला तेथे व्यवहार खुंटला – जवळचे द्रव्य संपले की सर्व कामे अडतात
- पैशाची भवानी नवटाक तेल – कमी किमतीच्या वस्तूंसाठी खूप पैसे खर्च करणे
- पैसा कसा मोडू मला येते रडू – कंजूष माणसाला पैसा खर्च करणे अतिशय जड जाते
- पैसा काही झाडाला लागत नाही – श्रम केल्याशिवाय पैसा मिळत नाही
- पोटचा कोर आणि झाला थोर – स्वतः चा मुलगाही आपले म्हणणे ऐकत नाही
- पोटाला द्यावे आणि काम घ्यावे – कोणतेही श्रम फुकट घेऊ नये
- प्रयत्नांती परमेश्वर – प्रयत्न केला तर कोणताही गोष्ट साध्य होते
- प्रपंचाला वित्त आणि परमार्थाला चित्त – संसाराला पैसा व परमार्थाला अंतःकरण हवे
- प्राणावर आले होते पण शेपटावर बेतले – थोड्यावर निभावणे
- पडणार्यास एक पन शोधणाऱ्यास बारा वाटा – लबाडी करणे सोपे पन ती शोधून काढणे फार कठीण
- फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय – राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो
- फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे – जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा