संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 16

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 16 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 16

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 16

  • भीड भिकेची बहीण – उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे
  • भीक नको पण कुत्रा आवर    – एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती
  • भागीचे घोडे की किवणाने मेले – भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही
  • भाड्याचे घर आणि खाली कर – ज्या गोष्टीवर आपली सत्ता नाही ते केव्हा आपल्या हातून जाईल सांगता येत नाही 
  • भोळ्याचा देव सोळा  – भोळ्याभाबड्या मनुष्याचा सर्वावर विश्वास बसतो 
  • भरली मूठ सव्वा लाखाची  – जे असेल ते गुपितच ठेवावे 
  • भरवशाची मोट पाण्यात लोट  – ज्याच्या बद्दल पक्का विश्वास असेल त्यालाच काम सांगावे
  • भलताच व्यापार केला, तो अंगाला आला  – ज्या गोष्टी आपल्याला काही समजत नाही त्या गोष्टीत ढवळाढवळ केली तर नुकसानच होते 
  • भलताच मटके आणि वटाणे गिटके- आंबट शौकीन मनुष्य 
  • भरल्या गाडीस तूप जड नाही  – जो पुष्कळ काम करतो त्याला आणखी एखादे छोटेसे काम दिले तर त्याला कठीण वाटत नाही 
  • भांडणापेक्षा अबोल बरा  – भांडण करण्यापेक्षा न बोलणे अधिक चांगले 
  • भाताला तांदूळ नाही पाण्याला आदान नाही  – कशाला काही ठिकाण नाही 
  • भाजी सारखे परतावे आणि जगासारखे वर्तावे जशी साधणे असली तशी कामे करावी 
  • भिकार्‍यांच्या पोराला ओकाली फार  – जो भिकेचे खातो त्याला मस्ती फार येते 
  • भिंतीस कान दारास डोळे  – कोणतीच गोष्ट गुप्त राहत नाही 
  • भुकेला म्हणतो आता खाईन संतुष्ट म्हणतो मग जेवीन  – गरजू माणूस आवश्यक वस्तूंसाठी हात पसरवितो पण ज्याला गरज नाही तो म्हणतो पुढे पाहू 
  • भोग संपला पुरता , लोटून घाली परूता  – भोग संपल्याशिवाय अजिबात सुटका होत नाही 
  • भोग्या मिळेल तशी रात्र काढावी  – जशी वेळ पडेल तसे वर्तन करावे 
  • भोळा ग बाई भोळा अन् सगळ्या पापाचा गोळा  – दिसायला गरीब पण भारी व्यसनी 
  • भ्रमाची पुडी  नि हिंगाचा  वास  – आधी खूप श्रीमंती पण आता नुसता देखावा 
  • भिकेची हांडी  शिंक्यास चढत नाही  – हलक्या प्रतीच्या प्रयत्नांनी ध्येय साकार होत नाही 
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात –  लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुणदोषांचे दर्शन होते.
  • मेल्या म्हशीला मणभर दूध  – मनुष्य मेल्यावर त्याचे गुणगान करणे.
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
  • मनात मांडे पदरात धोंडे – केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती
  • मनी वसे ते स्वप्नी दिसे – ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे
  • मनाची नाही पण जनाची तरी असावी – एखादी वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा
  • मन जाणे पाप  – आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच
  • मऊ मेणाहुनी विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे  – संत महात्मे प्रसंगी फार सौम्य, शांत असतात; परंतु कठीण वेळ येताच ते फार कठोर होतात
  • मगरी मगरी तुझी पाठ मऊ – वाईट मनुष्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्याच्या कूकर्माचीही प्रशंसा करावी लागते 
  • मन चिंती ते वैरीही न चिंती  – आपल्या मनात जेवढे वाईट विचार आणि जेवढ्या वाईट कल्पना येतात तेवढे वाईट विचार वा कल्पना आपल्या शत्रुच्या ही मनात येत नाहीत 
  • मन माने तो कायदा  – जे आपल्या मनाला योग्य वाटेल तोच नियम धरून चालणे 
  • मन साहे ते दान, तन साहे ते स्नान  – मनाला व तनाला सोसेल तेवढेच काम करावे 
  • मनी नाही भाव देवा मला पाव  – जर मनात परमेश्वरा विषयी श्रद्धा नसेल तर परमेश्वर कसा प्राप्त होईल 
  • मरावे परी कीर्ती रूपे उरावे  – वेळ पडली तर मरण पत्करावे परंतु कीर्तीचा सुगंध उरला पाहिजे 
  • मन राजा मन प्रजा    – हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असत
  • मनात असेल तर मार्ग दिसेल  – इच्छा असली की मार्ग दिसतोच 

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply