स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-1

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-1 शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द – One word substitutionस्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा शब्दसमूहबद्दल एक शब्द

एका शब्दाच्या प्रतिस्थापनाचा अर्थ असा होतो की एखाद्या विशिष्ट शब्दाचा वापर करून शब्दयुक्त वाक्यांश किंवा वाक्य बदलून ते लहान, संक्षिप्त आणि समजण्यास स्पष्ट केले जाते. अशाप्रकारे, शब्द वाक्याशी एकरूप होतो आणि अशा प्रकारे शब्दयुक्त वाक्यासारखाच अर्थ प्रदान करतो.तसेच, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप महत्वाचे आहे, कारण साधारणपणे परीक्षेत त्याच्याशी संबंधित 2 ते 4 प्रश्न विचारले जातात.शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द – One word substitutionस्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी  शब्दसमूहबद्दल एक शब्द
स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-1
  • अरण्याचा राजा- वनराज
  • अरण्याची शोभा –      वनश्री
  • अपेक्षा नसताना – अनपेक्षित
  • अस्वलाचा वेळ करणारा – दरवेशी
  • अंग राखून काम करणारा – अंगचोर
  • अनुभव नसलेला – अननुभवी
  • अन्न देणारा – अन्नदाता
  • अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक
  • अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष पुरविणारा- अष्टावधानी
  • अचुक गुणकारी असे- रामबाण
  • अंतःकरणाला पाझर फोडणारे – ह्रदयद्रावक
  • अग्नी विझवल्यानंतर राहणारी पांढरी भुकटी – राख
  • अगदी न बोलणारा – मुखस्तंभ
  • अन्नाची भिक्षा मागणारा – माधुकरी
  • अतिशय सुंदर पुरुष – मदनाचा पुतळा
  • अतिशय मोठे प्रयत्न – भगीरथ प्रयत्न

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

  • अधाशीपणे तोंड भरून घेतलेला घास – बोकना, बोकणा
  • अतिशय वृद्ध झालेला माणूस – पिकले पान
  • अत्यंत रोड अशी व्यक्ती – पाप्याचा पितर
  • अत्यंत खोल (गूढ) मसलत करणारा – पाताळयंत्री
  • अतिशय दुर्मिळ असा आलेला अनुकूल योग – पर्वणी
  • अक्षर ओळख नसलेला – निरक्षर
  • अनेक पदार्थांच्या समुदायात जे उत्तम असेल ते     – नगदमाल
  • अतिशय उग्र स्वरूप धारण करणारा –     नृसिंहावतार
  • अर्थ न समजता केलेले पाठांतर – पोपटपंची
  • अगदी दुर्मिळ झालेली वस्तू किंवा व्यक्ती – उंबराचे फूल
  • अतिशय लवकर रागावणारा – शीघ्रकोपी
  • अंधाच्या रात्रीचा पंधरवडा –     कृष्णपक्ष, वद्द्यपक्ष
  • अत्यंत हट्टी पुरुष –  अडेलतट्टू 
  • अनेक चांगल्या गुणांनी युक्त     – अष्टपैलू
  • अत्यंत उदार मनुष्य  – कर्णाचा अवतार
  • अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती     – गळ्यातील ताईत
  • अत्यंत गरीब स्वभावाची व्यक्ती – गोगलगाय
  • अत्यंत रागीट मनुष्य – जमदग्नी
  • अक्कल शून्य, हो ला हो करणारा – नंदीबैल
  • अगदी पूर्वीपासून राहणारे- आदिवासी 
  • अस्पर्शी असे जंगल- कुवार 
  • अत्यंत उदार मनुष्य- कर्णाचा अवतार 
  • अतिशय खोल मसलत करणारा- पाताळयंत्री 
  • अंगावर पूर्ण कपडे ठेऊन केलेली मनसोक्त अंघोळ- सचैल स्नान 
  • अवस्थांतर वा बदल होत असलेला- संक्रामक
  • आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची माळ – तोरण
  • आपल्या लहरीप्रमाणे वागणारा -स्वच्छंदी
  • आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक – साप्ताहिक
  • आग विझविणारे –      अग्निशामक
  • आधी जन्मलेला –       अग्रज
  • आवरता येणार नाही असे- अनावर
  • आकाशात गमन करणारा- खग
  • आकाशाचा भेद करणारे – गगनभेदी
  • आजारी लोकांची (रोग्यांजी) शुश्रूषा करणारी- परिचारिका
  • आई वडील नसलेली / नसलेला – पोरकी / पोरका
  • आपल्याच देशात तयार झालेली वस्तू (माल) – स्वदेशी
  • आईचे मुलांविषयी प्रेम – वात्सल्य
  • आईच्या वडिलांचे गाव- आजोळ 
  • आपल्याबरोबर वेळात भाग घेणारा मित्र – खेळगडी
  • आपल्याच मताप्रमाणे चालणारा – हटवादी, हेकेखोर
  • आपल्याच फायदा करून घेणारे – स्वार्थसाधू, अप्पलपोटा
  • आठवड्यातून दोन वेळा / तीन वेळा प्रसिद्ध होणारे –          विसाप्ताहिक/त्रिसाप्ताहिक
  • आयुष्यात शेवटी मिळवायचे ते – ध्येय
  • आगावू खर्चासाठी दिलेली रक्कम – अनामत
  • आपापसात हळूच बोलणे –       कुजबूज
  • आपले काम साधण्यापुरते आर्जव – ताकापुरते रामायण
  • आकुंचित मनाचा – कूपमंडूक

  • आपापसातील कलह – यादवी
  • आपल्यावेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा        – युगपुरूष
  • अचरणासाठी मुद्दाम केलेला एखादा धार्मिक नियम – व्रत
  • आश्चर्यकारक दैवी शक्ती – सिद्धी
  • आकाश जमिनीस टेकलेले दिसते ती मर्यादा – क्षितीज
  • आतल्या आत जाणवणारा – आंतरिक 
  • आकाशातील तार्‍यांचा पट्टा- आकाशगंगा 
  • आपल्या स्वेच्छेने सेवाभावी वृत्तीने काम करणारा – स्वयंसेवक 
  • आपल्या धन्याशी निष्ठेने वागणारा  – स्वामीनिष्ठ
  • ओढून ताणून जोडलेला संबंध- बादरायन संबंध 
  • इच्छिलेली वस्तू देणारा वृक्ष – कल्पवृक्ष
  • इच्छित वस्तू देणारी गाय इच्छिलेली वस्तू देणारा मणी – कामधेनू
  • इतरांबरोबर बेपर्वाईने वागणारा – अरेराव
  • इंद्राचा खजिनदार, अतिशय संपत्तीमान पुरूष –      मार्गदर्शक
  • इच्छा, आशा, लोभ सोडून देऊन इश्वराची प्राप्ती     – कुबेर
  • करून घेण्याचा प्रयत्न करणारा – योगी
  • इतरांना मार्ग दाखवणारा- मार्गदर्शन 
  • इच्छिलेला देणारा मणी- चिंतामणी 
  • ईश्वरधर्म (देव) आहे असे मानणारा – आस्तिक
  • ईश्वरधर्म (देव) नाही असे मानणारा – नास्तिक
  • उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
  • उतारूनी थांबण्याजी जगा –       प्रतिक्षालय
  • उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती- कृतज्ञता
  • उग्र व पराक्रमी मनुष्य – नरसिंह
  • उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती – कृतघ्नता
  • उत्सवप्रसंगी दिवे लावण्यासाठी मंदिरासमोर उभारलेला स्तंभ – दीपमाळ
  • उंचावरून पडणारा पाण्याचा लोट – धबधबा
  • उत्कर्ष दाखविणा-या तळहातावरील रेषा – भाग्यरेषा
  • उदार व मोठ्या मनाचा – दिलदार
  • उच्च दर्जा असलेला सुंदर महल – आलिशान
  • उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
  • उंटावरून टपाल नेणारा स्वार – सांडणी स्वार
  • उपकाराची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न, अनुपकारी
  • उपकाराखाली ओशाळा बनलेला – मिंधा
  • उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ- लवाद 
  • ऊस पेरलेले वावर       – फड
  • एखादी गोष्ट नाही अशी स्थिती – अभाव
  • एका धर्मातून दुस-या धर्मात जाणे – धर्मांतर 
  • एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी

  • एकटा राहणारा – एकलकोंडा
  • एकाच काळातील      – समकालीन
  • एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला – स्थानबद्ध
  • एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
  • एखाद्या प्रदेशात किंवा जंगलात अगदी मुळापासून राहणारे लोक – आदिवासी
  • एखाद्याच्या आठवणीदाखल केलेली गोष्ट – स्मारक
  • एकादशी दिवशी भजन कीर्तनात करावयाचे जागरण –        हरिजागर
  • एक लाभदर्शक धार्मिक प्रतीक – स्वस्तिक
  • एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न, अभ्यास –      साधना
  • एखाद्या गोष्टीचा आरंभ – श्री गणेशा
  • एकाला उद्देशून दुस-याला बोलणे – अन्योक्ती

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply