स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022- स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022 -MPSC स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha vakyaprachar va tyanche artha 2022-MPSC Spardha pariksha marathi vkyakran 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022

विराजमान होणे  – आसनस्थ होणे 
विधी करणे  – शौचास जाणे 
विरजण पडणे  – हिरमोड होणे 
वीरश्री संचारणे  – पराक्रम गाजवावेसे वाटणे 
वीट येणे  – कंटाळा येणे 
वेठीस धरणे  – सक्तीने कामाला लावणे 
वेड पांघरणे- वेड्याचे सोंग घेणे 
वेड भरणे  – नाद लागणे 
वेडे होणे  – देहभान विसरणे 
शब्द जमिनीवर पडू न देणे -दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे
शहानिशा करणे -एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे
शिगेला पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे
शंभर वर्ष भरणे -नाश होण्याची वेळी घेणे


श्रीगणेशा करणे – आरंभ करणे
शकुन पाठ बांधणे – पक्के ध्यानात ठेवणे 
शेंडी हाती घेणे  – स्वाधीन होणे 
शेण खाणे  – व्यभिचार करणे 
शस्त्र धरणे- हत्यार घेऊन उठणे 
शेत उतरणे  – शेत चांगले पिकणे 
शेव करणे  – जमीन वखर येणे 
शिळ्या कढीला ऊत येणे  – मागच्या गोष्टी उकरून काढणे 
शेर होणे  – बलिष्ठ होणे 
शितावरून भाताची परीक्षा करणे  – थोड्या वरुण संपूर्ण गोष्टीची परीक्षा करणे 
शोभा करणे  – लोकांसमोर अपमान करणे 
सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
सई होणे  – नीटनेटके होणे 
सपाट होणे  – नाहीसा होणे 
सफर साधणे  – प्रवासाचा हेतू साध्य करणे 
समय साधणे  – वेळ साधणे
समय चुकणे- संधी गमावणे 

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022


समूळ खनून काढणे- नायनाट करणे 
सर येणे  – बरोबरी होणे 
सळो की पळो करून सोडणे  – सारखं त्रास देणे 
सर करणे  – हस्तगत करणे 
साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे
सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे
साक्षर होणे – लिहिता-वाचता येणे
साक्षात्कार होणे – आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
साखरेची साल काढणे  – अतिशय सूक्ष्म छाननी करणे 
साठी उलटणे  – म्हातारपण येणे 
सावली पडणे  – पूर्वचिन्ह होणे 
सावली पायाखाली येणे  – माध्यान्ह होणे 
साक्षी येणे  – अनुभवास येणे 
सुताने स्वर्गाला जाणे- थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे 
सूतोवाच करणे – पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे
संधान बांधने – जवळीक निर्माण करणे
सूपाएवढे काळीज करणे- मन विशाल करणे 


सूप वाजणे- कार्य संपणे 
सूर्यावर थुंकणे  – थोर माणसाची निंदा करणे 
सुंठी वाचून खोकला जाणे  – उपायाशिवाय समस्या सुटणे 
सुळावर ची पोळी  – अतिशय धोक्याचे काम 
संभ्रमात पडणे – गोंधळात पाडणे
संधान बसणे  – जवळीक निर्माण होणे 
संकटासमोर उभा राहणे  – संकटातस तोंड देणे
सांगड घालणे- संबंध जोडून येणे 
सुंठ मोडणे- कडूपणा आणणे 
सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे
सोंग करणे- नक्कल करणे 
स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे
स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणे
हट्टाला पेटणे – मुळीच हट्ट न सोडणे
हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे
हरभऱ्याच्या झाडावर चढणे-खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
हसता हसता पुरेवाट होणे – अनावर हसू येणे


हस्तगत करणे – ताब्यात घेणे
हत्यार धरणे  – मारू इच्छिणे 
हवा खाणे  – उघड्या मैदानात फिरणे 
हवा बिघडणे  – हवा दूषित होणे 
हातपाय गळणे – धीर सुटणे
हातचा मळ असणे – सहजशक्य असणे
हात ओला होणे – फायदा होणे
हाय खाणे – धास्ती घेणे
हात चोळणे – चरफडणे
हातावर तुरी देणे- डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे
हात झाडून मोकळे होणे- जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून मोकळे होणे
हाता पाया पडणे – गयावया करणे
हातात कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे
हाताला हात लावणे – थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
हातावर शीर घेणे- जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे
हात धुवून पाठीस लागणे – चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
हाडांची काडे करणे- अतिकष्ट करणे
हाडे खिळखिळी करणे- भरपूर चोप देणे
हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे


हातघाईवर येणे- मारमारीची पाळी निर्माण करणे
हातचा मळ असणे- एखादी गोष्ट सहज करता येणे
हात झटकणे- नामानिराळा होणे
हात टेकणे- नाईलाजाने शरण येणे
हात दाखवणे- मार देणे, फसवणे
हात देणे- मदत करणे
हात मारणे- ताव मारणे 
हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे
हातापाया पडणे- लाचारीने विनवण्या करणे
हातावर तुरी देने- डोळ्यादेखत फसवून पळणे
दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणे
हृदय भरून येणे- गदगदून येणे
हात दगडाखाली सापडणे  – अडचणीत असणे 

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply