Current affair November 2021 Online test -2-Current affair 2021 test Question paper-2-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- तेलंगाना उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
उत्तर :- हिमा कोहली.
- मद्रास उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
उत्तर :- संजीब बॅनर्जी.
- जम्मू व काश्मिर आणि लडाख उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
उत्तर :- पंकज मिथाल.
- रेल्वे मंडळ (रेल्वे मंत्रालय) याचे नवीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भारत सरकारचे पदसिद्ध प्रधान सचिव
उत्तर :- सुनीत शर्मा
Current affair November 2021 Online test -2
- 01 जानेवारी 2021 पासून सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांचे नवीन महासंचालक
उत्तर :- व्हाइस अॅडमिरल रजत दत्ता.
- भारतीय रिझर्व्ह बँकेनी भारतात रोखविरहित व्यवहारांमधली वाढ मोजण्यासाठी एक ______ जाहीर केला
उत्तर :- डिजिटल पेमेंट्स इंडेक्स.
- भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाने _____ या दक्षिण आशियाई देशांकरिता ‘फ्लॅश फ्लड मार्गदर्शन सेवा’ सादर केली आहे
उत्तर :- भारत, बांगलादेश, भुटान, नेपाळ आणि श्रीलंका.
- या संघटनेनी “ई-खादी इंडिया” नामक एक ई-वाणिज्य संकेतस्थळाचे अनावरण केले आहे, जिथे स्थानिक पातळीवर बनवलेल्या खादी व ग्रामीण उद्योग उत्पादनांची विक्री केली जाणार
उत्तर :- खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC).
- केंद्रीय मंत्रिमंडळाने बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापरासाठी भारत आणि _____ दरम्यान सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला मंजूरी दिली
उत्तर :- भुटान.
- आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकार यांनी ____ राज्यात फलोत्पादनाचा विस्तार करण्यासाठी प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने 10 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली
उत्तर :- हिमाचल प्रदेश.
- जम्मू व काश्मिरच्या फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी, जम्मू व काश्मिर सरकारने _____ सोबत एक सामंजस्य करार केला
उत्तर :- भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (NAFED)
- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनी (IAEA) खुलासा केला आहे की ____ देशाने फोर्डोव इंधन समृद्धीकरण प्रकल्पात युरेनियमला 20 टक्क्यांपर्यंत शुद्ध करण्याची योजना आखली आहे
उत्तर :- इराण.
- वनस्पती-आधारित औषधे आणि अर्क काढण्यासाठी देशातला आणि आशियातला पहिला समर्पित औद्योगिक पार्क
उत्तर :- ‘धन्वंतरी हर्बल पार्क’ (मोहना, इंदूर जिल्हा, मध्यप्रदेश).
- 16 ते 24 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या 51व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) याचे आयोजन स्थळ
उत्तर :- गोवा.
- 450 किलोमीटर लांबीची कोची- मंगळुरू नैसर्गिक वायू पाइपलाइन तयार करणारी कंपनी
उत्तर :- GAIL (इंडिया) लिमिटेड.
- ‘पोलीस सेवा K9s’ (PSKs) अर्थात ‘पोलीस कुत्रे’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन
उत्तर :- “नॅशनल पोलीस K-9 जर्नल”.
- नवी दिल्लीच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन-राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (CSIR-NPL) यांच्यावतीने 4 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेचा विषय
उत्तर :- ‘मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन’.
- नवे ‘नॅशनल अटॉमिक टाइमस्केल’ ____ एवढ्या अचूकतेसह भारतीय मानक वेळ निर्माण करते
उत्तर :- 2.8 नॅनो सेकंद.
- नवीन _______ आंतरराष्ट्रीय स्तराच्या मानाने गुणवत्ता आश्वासनासाठी प्रयोगशाळांच्या चाचणी आणि मानकीकरणला मदत करते
उत्तर :- ‘भारतीय निर्देशक द्रव्य’.
- नवीन _____ हे परिवेशी वात आणि औद्योगिक उत्सर्जन अधीक्षण उपकरणे यांच्या प्रमाणन प्रक्रियेत आत्मनिर्भरतेमध्ये मदत करणार
उत्तर :- ‘राष्ट्रीय पर्यावरणी मानक प्रयोगशाळा’.
- ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) आणीबाणी परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी भारत बायोटेकची ____ ही स्वदेशी कोविड लस आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या ‘कोविशिल्ड’ लसीला परवानगी दिली
उत्तर :- ‘कोवॅक्सिन’.
- फेडरल बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक पदी पुनर्नियुक्ती झालेली व्यक्ती
उत्तर :- आशुतोष खजुरिया
- _____ येथे गुजरातची पहिली ‘स्कीन बँक’ स्थापन करण्यासाठी शासकीय रुग्णालय आणि रोटरी क्लब यांच्यात सामंजस्य करार झाला
उत्तर :- शासकीय रुग्णालय परिसर, अहमदाबाद.
- हे राज्य सरकार राज्यभर ‘रयथू भरोसा केंद्र’ योजनेच्या अंतर्गत कृषी विपणन व अन्नप्रक्रियाचा समावेश असलेली बहुउद्देशीय सुविधा केंद्रे स्थापन करणार
उत्तर :- आंध्रप्रदेश.
- अंतराळातला कचरा कमी करण्यासाठी लाकडी उपग्रह विकसित करून 2023 सालापर्यंत ते अंतराळात पाठविण्याची योजना आखणारा देश
उत्तर :- जपान (क्योटो विद्यापीठ आणि सुमितोमो कंपनी)