Current affair 2021 test Question paper-3- Current affair 2021 test Question paper-1-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- या देशाच्या संसदेनी पाकिस्तान देशाच्या महिलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘मलाला यूसुफजई शिष्यवृत्ती कायदा’ मंजूर केला
उत्तर :- अमेरिका
- आदिवासी कामकाज मंत्रालयांच्या अंतर्गत कार्यरत _____ ही संस्था ईशान्येकडील राज्यांचा विकास आणि पारंपारिक आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्वी विपणन आणि मालवाहतूक हस्तक्षेप राबविण्यासाठी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय आणि इंडिया पोस्ट सोबत सहकार्य करणार
उत्तर :- भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED)
- _____ येथील मुख्य टपाल कार्यालयात आदिवासी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी TRIFED आणि इंडिया पोस्ट एकत्रितपणे कार्य करणार आहेत
उत्तर :- अहमदाबाद, गुजरात.
- बंदरे, जलवाहतुक व जलमार्ग मंत्रालय “सागरमाला सीप्लेन सेवा (SSPS)” याच्या संयुक्त विकासाची आणि चालनाची प्रक्रिया सुरू करीत आहे, जे _____ सहीत विशेष प्रयोजन वाहन (SPV) तयार करून हाती घेतले जाणार
उत्तर :- सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (SDCL).
Current affair November 2021 online test-3
- पहिले राज्य जिथे 2021 साली कामगार विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) योजनेत 100 दिवसांपेक्षा जास्त काम करणारे 20 लक्ष कामगारांची नोंद झाली
उत्तर :- उत्तरप्रदेश.
- आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहीलेले आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले माजी केंद्रीय मंत्री, ज्यांचे 2 जानेवारी 2021 रोजी निधन झाले
उत्तर :- बुटा सिंग.
- या विद्यापीठाने मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांना मानद डॉक्टरेट ऑफ लॉ पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे
उत्तर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.
- ___ राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये ‘ट्रायफूड पार्क’ उभारण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला
उत्तर :- मध्यप्रदेश.
- “तामिळ भाषा व संस्कृतीचे रक्षण” करण्याच्या उद्देशाने, या केंद्रशासित प्रदेश सरकारने एक ‘तामिळ अकादमी’ स्थापन करण्याची योजना जाहीर केली
उत्तर :- दिल्ली.
- प्रथम देश ज्याने ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाव्हायरस स्ट्रेनला प्रयोगशाळेत वाढविण्यात यश आले
उत्तर :- भारत
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी 2021 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची अंदाजित रक्कम
उत्तर :- 3.231 अब्ज डॉलर.
- लॅटिन अमेरिकेतला पहिला मोठा देश ज्याने गर्भधारणेच्या 14 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करणे कायदेशीर केले –
उत्तर :- अर्जेंटिना
- 5 जानेवारी 2021 रोजी भारताने _____साठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आरंभ केला; गोव्याहून 43 सदस्यांसह ‘चार्टर्ड आईस’ श्रेणीचे ‘एमव्ही वॅसिली गोलोव्हिन’ जहाज रवाना झाले
उत्तर :- अंटार्क्टिका.
- ______ याचा 306 कि.मी. लांबीचा नवा रेवाडी-नवा मदार पथ खंड हरयाणा (अंदाजे 79 कि.मी.) आणि राजस्थान (अंदाजे 227 कि.मी.) या राज्यांमध्ये आहे
उत्तर :- वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (WDFC).
- वन व पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेल्या ‘वनस्पती वर्गीकरण शास्त्रासाठी ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ याचा विजेता
उत्तर :- वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. मामियील साबू.
- या राज्य सरकारने बाल देखरेख संस्थांमधून बाहेर पडणार्या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींसाठी ‘लाँच पॅड योजना’ तयार केली असून त्याद्वारे ते स्वावलंबी होऊ शकणार
उत्तर :- मध्यप्रदेश.
- महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती नाना पटोले यांच्या हस्ते _____ शहरात राज्य विधानसभेच्या सचिवालयाच्या स्थायी कार्यालयाचे उद्घाटन झाले
उत्तर :- नागपूर.
- 28 जानेवारीला (2021 साली) भगवान मुरुगाच्या पूजेसाठी समर्पित असलेला ‘थाई पूजम’ उत्सवासाठी या राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली
उत्तर :- तामिळनाडू.
- या राज्य सरकारने 6 जानेवारी पासून ‘किसान कल्याण अभियान’चा आरंभ केला
उत्तर :- उत्तरप्रदेश.
- मुलगीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ___ राज्यात शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला दररोज 100 रुपये दिले जाणार
उत्तर :- आसाम.
- इलेक्ट्रिक ट्रॅक्शनद्वारे वाहिली जाणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी तयार करणार देश
उत्तर :- भारत (नवा अटेली-नवा किशनगड दरम्यान धावणार).
- भारत आणि _____ या देशांनी 50-70 कि.मी.च्या मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली
उत्तर :- इस्त्रायल.
- भारतीय भूदलाच्या नव्याने तयार केलेल्या मानवाधिकार कक्षाचे प्रमुख कोण आहेत
उत्तर :- मेजर जनरल रँकचे अधिकारी.
- भारतीय भूदलात पहिले अतिरिक्त महासंचालक (मानवाधिकार) म्हणुन कोणाची निवड झाली
उत्तर :- मेजर जनरल गौतम चौहान.
- कोणत्या शहरात भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) मुख्यालय तयार केले जाणार आहे
उत्तर :- नवी दिल्ली.