Current affair November 2021 online test-15

Current affair November 2021 online test-15-Current affair 2021 test Question paper-15-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) अहवालानुसार, 2020 साली प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीचा (FDI) सर्वाधिक प्राप्तकर्ता

उत्तर :-   चीन (163 अब्ज डॉलर)

 • बॉन येथील जर्मनवॉच संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2021’ याच्यानुसार, 2019 साली जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत _____ होता

उत्तर :-   सातवा

 • एकाच अग्निबाणाने 143 उपग्रह प्रक्षेपित करून नवीन जागतिक विक्रम रचणारी कंपनी

उत्तर :-   स्पेसएक्स, अमेरिका.

 • 24 जानेवारी 2021 रोजी उद्घाटन झालेल्या ‘जागतिक आर्थिक मंच (WEF)’ याच्या आभासी ‘दावोस एजन्डा’ शिखर परिषदेचे अध्यक्ष

उत्तर :-    क्लाऊस श्वाब (WEFचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष).

 • एस्टोनिया देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत

उत्तर :-   काजा कलास.

 • भारताचा आत्मा साजरा करण्यासाठी, 26 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेला वार्षिक कार्यक्रम

उत्तर :-   भारत पर्व

 •  संवाद” (माय हेल्थ माय रिस्पॉन्सिबिलिटी) या शीर्षकाखाली आयुर्वेद आणि कोविड-19 साथीबाबत जनजागृती कार्यक्रमाचा आयोजक

उत्तर :-    अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, नवी दिल्ली.

 • भारतीय वंशाचा प्रथम कवी ज्याने ‘हाऊ टू वॉश ए हार्ट’ या कवितासंग्रहासाठी ब्रिटनमध्ये प्रतिष्ठित टी. एस. इलियट पुरस्कार जिंकला

उत्तर :-   भानु कपिल (महिला)

 • 25 जानेवारी 2021 रोजी 50 वा राज्य स्थापना दिन साजरा करणारे राज्य कोणते

उत्तर :-   हिमाचल प्रदेश.

Current affair November 2021 online test-15
Current affair November 2021 online test-15

Current affair November 2021 online test-15

 • तंत्रज्ञान, संस्कृती आणि क्रिडा क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या लोकांचा गौरव करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारचा नवीन पुरस्कार

उत्तर :-   यूपी गौरव सन्मान.

 • महिला सक्षमीकरणाचा दृष्टीकोन समजण्यासाठी मुलींच्या आरोग्य / शिक्षण / सुरक्षेवर केंद्रित असणारी मध्यप्रदेश सरकारची नवीन योजना

उत्तर :-   ‘पंख’ अभियान

 • होलोकॉस्ट (आगीने विशेषतः मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस) याला बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ (27 जानेवारी) याची संकल्पना

उत्तर :-    “फेसिंग द आफ्टरमॅथ: रीकव्हरी अँड रिकॉन्स्टीट्यूशन आफ्टर द होलोकॉस्ट”

 • महावीर चक्र 2021 (द्वितीय सर्वोच्च लष्करी पुरस्कार) याचा प्राप्तकर्ता

उत्तर :-  कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (मरणोत्तर).

 • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने प्रथमच ‘आकाश-NG’ नामक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली; ते नवीन पिढीचे _____ आहे

उत्तर :-  पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र.

 •  भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सादर केलेले एक मानक वैयक्तिक त्वरित अॅन्युइटी उत्पादन

उत्तर :-  “सरल पेन्शन”

 • 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाईन ‘आंतरराष्ट्रीय हवामान अनुकूलन शिखर परिषद (CAS) 2021’ याचा आयोजक

उत्तर :-  नेदरलँड.

 • या देशाच्या तुकडीने पहिल्यांदाच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पथप्रदर्शनात भाग घेतला

उत्तर :-  बांगलादेश.

 • राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (NCLAT) याचे पाचवे नवे पीठ

उत्तर :- चेन्नई.

 • जयपूर, कटक, कोची, इंदूर आणि _____ येथे NCLATच्या पाच नवीन पीठांची घोषणा करण्यात आली असून, एकूण पीठांची संख्या (नवी दिल्लीत प्रधान पीठासह) 16 झाली आहे

उत्तर :- अमरावती.

 • राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (NABARD) सहकार्याने आयोजित ‘अ‍ॅग्री-फूड टेकाथॉन 2021’ कार्यक्रमाचा आयोजक

उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर.

      321)‘पद्मश्री 2021’ प्राप्त करणारी तृतीयपंथी व्यक्ती

          उत्तर :-   मंजम्मा जोगती (कर्नाटकमधले लोक नर्तक)

 • केरळच्या धनलक्ष्मी बँकेचे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर :-  जे. के. शिवन.

 • ‘पद्मविभूषण 2021’ प्राप्त करणारे

उत्तर :-    जपानचे शिंजो आबे (नागरी सेवा), अमेरिकेचे नरिंदर सिंग करपानी (विज्ञान व अभियांत्रिकी), एस. पी. बालसुब्रमण्यम, डॉ. बेले मोनप्पा हेगडे, मौलाना वहीदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहू.

 • क्रिकेटचा ‘सय्यद मुस्ताक अली करंडक 2020-21’ 26-31 जानेवारी या कालावधीत ___ शहरात खेळला जाणार आहे

उत्तर :-  अहमदाबाद, गुजरात.

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते _____ याच्या भारतीय सफारीचे उद्घाटन झाले

उत्तर :-  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर.

 • राज्य सरकारने मान्यता दिलेल्या ‘केरळ रबर लिमिटेड’ नामक नवी रबर सहकारी संस्थेचे मुख्यालय

उत्तर :-  कोट्टयम जिल्ह्यात वेलूर न्यूजप्रिंट कारखान्याच्या जागेवर.

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply