संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 7-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 7
- गत्यंतर नसणे – नाईलाज असणे, दुसरा उपाय नसणे.
- गंध नसणे – अजिबात माहीत नसणे.
- गर्भगळीत होणे – अतिशय घाबरणे, भयभीत होणे.
- गमजा करणे – हुशारी मारणे.
- गृहीत धरणे – मनात निश्चित कल्पना करणे.
- गराडा घालणे – वेढा घालणे, घेराव घालणे.
- गळा कापणे – विश्वासघात करणे.
- गळा गुंतणे – अडचणीत सापडणे, अडचणीत घालणे.
- गळ्याशी येणे – नुकसानी बाबत अतिरेक होणे.
- गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.
- गळी उतरणे – पटणे.
- गवन्या मसणात जाणे – मृत्यूकाल जवळ असणे.
- गळ्याशी पाणी लागणे – पराकाष्ठेचे कर्ज होणे.
- गळा भरून येणे – गहिवरून येणे.
- गहजब करणे – फार बोभाटा करणे.
- गळा काढून रडणे – मोठा आवाज काढून रडणे.
- गळून पडणे – मरणे.
- गप्प राहणे – काहीही न बोलणे.
- गडगडून हसणे – मोकळ्या मनाने हसणे.
- गम खाणे – धीर धरणे.
- गळ्याला कोरड पडणे – अतिशय घाबरणे.
- गम्य असणे – थोडेसे ज्ञान असणे.
- गदगदून येणे – अंतःकरण भरून येणे.
- गळा धरणे – मारावयात प्रवृत्त होणे.
- गळा काढणे – रडणे.
- गळ्यात येणे – जबरदस्तीमुळे एखादी गोष्ट स्वीकारणे.
- गळ्यात गळा घालणे – अलिंगन देणे. गय करणे – क्षमा करणे.
- गलित गात्र होणे – शरीराचा अवयव न अवयव थकणे.
- गळी पडणे – एखाद्याच्या मागे लागणे.
- गहाण ठेवणे – कर्जाऊ घेतलेल्या पैशाबद्दल सावकाराकडे (बँकेत) एकादी मौल्यवान वस्तू ठेवणे.
- गळ्यात माळ घालणे – विजय मिळविणे, विवाह होणे.
- गळ्याला फास लागणे – प्राणघातक संकटात सापडणे.
- गंडा बांधणे – शिष्य होणे.
- ग्रह सुटणे – संकट दूर होणे.
- गंडांतर येणे – संकट येणे.
- गंध नसणे – मुळीच ज्ञान नसणे.
- गाई पाण्यावर येणे – डोळ्यात अश्रू उभे राहणे.
- गाजावाजा करणे – प्रसिद्धी देणे.
- गाशा गुंडाळणे – एकदम पसार होणे, निघून जाणे.
- गाडी पुन्हा रुळावर येणे – चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.
- गाळण उडणे – फार घाबरणे.
- गाठीस असणे – शिल्लक असणे, जवळ असणे. (गाठीला ठेवणे)
- गावी नसणे – लक्ष नसणे.
- गारुड करणे – जादू करणे.
- गावचा नसणे – काही एक संबंध न दाखवणे.
- गाढवाचा नांगर फिरणे – जमीनदोस्त करणे.
- गाळण होणे – भीतीने गांगरून जाणे.
- गाडा वळणावर येणे – सर्व सुरळीत होणे.
- गाठ पडणे – भेटणे.
- गाडी अडणे – कामात अडथळा येणे.
- गाल फुगविणे – रूसणे.
- गिरकी घेणे – स्वतःभोवती वर्तुळाकार फिरणे.
- गिल्ला करणे – गोंधळ करणे.
- गुण दाखविणे – खरे स्वरूप प्रकट करणे.
- गुंजत असणे – दुमदुमत असणे.
- गुजराण करणे – निर्वाह करणे.
- गुदगुल्या होणे – आनंदाच्या उकळ्या फुटणे.
- गुळणी फोडणे – लपवून ठेवलेली गोष्ट अखेरीस सांगून टाकणे.
- गुढी धरणे – नव्या उपक्रमाला सुरवात करणे.
- गुंगारा देणे – फसवून पळून जाणे.
- गुणगान करणे – स्तुती करणे.
- गोत्यात आणणे – संकटात घालणे.
- गोडवे गाणे – स्तुती करणे.
- गोंधळ उडणे – गडबडून जाणे.
- गोंडा घोळणे – खुशामत करणे.
- गोरामोरा होणे – भांबावणे.
- गोपाळकाला करणे – सर्व शिदोरया एकत्र करणे.
- गौरव करणे – सन्मान करणे, स्तुती करणे.
- गौडबंगाल असणे – गूढ गोष्ट असणे.
- घर डोक्यावर घेणे – घरात अतिशय गोंगाट करणे.
- घर धुवून नेणे – सर्वस्वी लुबाडणे, सर्वस्वाचा अपहार करणे.
- घडी भरणे – विनाशकाल जवळ येणे.
- घर सुने सुने वाटणे – उदास वाटणे.
- घर बुडविणे – सर्व कुलाचा घात करणे.
- घर भरणे – फायदा करून घेणे.
- घर बसणे – कुटुंबास विपत्ती येणे.
- घडा भरणे – परिणाम भोगण्याची वेळ येणे.
- घामाघूम होणे – खूप घाम येणे.
- घायाळ करणे – जखमी करणे.
- घाम न फुटणे – दया न येणे.
- घामाचे पाझर फुटणे – खूप घाम येणे.
- घाम गाळणे – खूप कष्ट करणे.
- घाट घालणे – बेत करणे.
- घाव घालणे – प्रहार करणे.
- घाला घालणे – हल्ला करणे.
- घात होणे – नाश होणे.
- घालून पाडून बोलणे – दुस-याला लागेल असे बोलणे.
- घोडे मारणे – नुकसान करणे.
- घोडे मध्येच अडणे – प्रगतीत खंड पडणे.
- घोडे थकणे (घोडे दामटणे) – उद्योग धंदा मंदावणे.
- घोडे पुढे ढकलणे – स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.
- घोडे पेंड खाणे – अडचण निर्माण होणे.
- घोडा मैदान जवळ असणे – एखाच्या गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे.
- घोर लागणे – काळजी निर्माण होणे.
- घोटाळा होणे – गोंधळ होणे, गडबड होणे.
- घोषित करणे – जाहीर करणे.
- घोळ घालणे – त्वरित निर्णय न घेता विचार करीत बसणे.
- घोरपड येणे – संकट येणे.
- घोरपडी सारखे चिकटणे – न थकता चिवटपणे काम करीत राहणे.
- चक्कर मारणे – सहज फिरायला जाणे.
- चतुर्भुज होणे – लग्न होणे, कैद होणे.
- चकीत करणे – थक्क करणे, आश्चर्य वाटायला लावणे.
- चंग बांधणे – निश्चय करणे, निर्धार करणे.
- चढवून ठेवणे – एखाद्याला वाजवीपेक्षा जास्त महत्व देणे.
- चव्हाट्यावर आणणे – उघडकीस आणणे, जाहीर करणे.
- चकित होणे – आश्चर्य वाटणे.
- चकरा मारणे – फे-या मारणे.
- चलबिचल सुरू होणे – अनिश्चिता निर्माण होणे.
- चटका बसणे – फार दुःख होणे.
- चहा असणे – आस्था असणे.