मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे

मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे

मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे’शब्दांचे व्याकरण चालविणे’ म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय.  

🌿आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम,किंवा सर्वनाम त्यांना होणा-या लिंग, वचन, विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ, अर्थ, प्रयोग, यांची संपूर्ण माहिती मिळविली.  

🌿या माहितीच्या ‘शब्दाचे व्याकरण चालविणे’ यासाठी उपयोग होतो. यालाच ‘पदपरिस्फोट’ असेही कोणी म्हणतात.

🌿१) नामाचे व्याकरण चालवणे :-

🌷नाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.

उदा.

१) त्यांनी घराला रंग दिला.

🌿घराला :- मूळ शब्द – घर, 

🌷प्रकार – नाम, 

🌿 – सामान्यनाम, 

🌿लिंग – नपुंसकलिंग, 

🌿वचन – एकवचन, 

🌿विभक्ती – चतुर्थी, 

🌿विभक्तीचा अर्थ – संप्रदान, 

🌿वाक्यातील स्थान – दिला या क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म.

🌷) सर्वनामाचे व्याकरण चालवणे :-

🌿सर्वनाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.

उदा.  

१) मी स्वत: एक कविता केली आहे.

🌿स्वत: :- मूळ शब्द – स्वत:, 

🌿प्रकार – सर्वनाम, 

🌿पोटप्रकार – आत्मवाचक सर्वनाम, 

🌿लिंग – उभयलिंगी, 

🌿वचन – एकवच, 

🌿विभक्ती – प्रथमा, 

🌿विभक्तीचा अर्थ – कर्ता, 

🌿वाक्यातील स्थान – कर्ता.

🌷🌷३) विशेषणाचे व्याकरण चालवणे :-🌷🌷

🌿विशेषण :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, कोणत्या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) माहिती देते ते विशेष्य.

उदा.  

१) बागेत चार माळी काम करत होते.

🌿चार :- मूळ शब्द – चार, 

🌿प्रकार – विशेषण, 

🌿पोटप्रकार – संख्याविशेषण.  

🌿माळी या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) विशेष माहिती देते

🌷४) क्रियापदाचे व्याकरण चालवणे :-🌷

🌿क्रियापद :- मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार, रूप, अर्थ, काळ, लिंग, वचन, पुरुष, वाक्याचा प्रयोग.

उदा.  

१) संतोष अभ्यास करत होता.

🌿करत होता :- मूळ धातू – कर, 

🌿क्रियापदाचा प्रकार – संयुक्त क्रियापद, 

🌿रूप – करुणरूप,

🌿अर्थ – स्वार्थ, 

🌿काळ – अपूर्ण भूतकाळ, 

🌿लिंग – पुल्लिंग, 

🌿वचन – एकवचन, 

🌿पुरुष – तृतीय पुरुष, 

🌿प्रयोग – कर्तरी.

🌷🌷५) अव्ययांचे व्याकरण चालवणे :-🌷🌷

🌿अव्यय :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, असल्यास काही विशेष माहिती.

उदा.

१) मी व माझा भाऊ रोज देवाला नमस्कार करतो.

🌿व :- मूळ शब्द – व, 

🌿प्रकार – उभयान्वयी अव्यय, 

🌿पोटप्रकार – समुच्चयबोधक, 

🌿’मी’ , ‘भाऊ’ या दोन शब्दांना जोडणारे.

सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा

All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply