MPSC ग्रुप B STI परीक्षा ऑनलाइन टेस्ट सोडवा, ग्रुप ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022, MPSC Group B Exam online Test, Mpsc Combine Test Online,
MPSC ग्रुप B STI परीक्षा ऑनलाइन टेस्ट सोडवा
अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पण अशा संयुक्त पूर्व परीक्षेचे हे दुसरेच वर्ष आहे. PSI, STI, Assistant (ASO) या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे या पदांसाठी सन २०१४पासून झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि गेल्या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही मंथन करणे आवश्यक आहे.
हा प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते.
त्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येते आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येते.
या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे दुय्यम सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.
प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेवर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.
पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI)
- PSI, STI आणि Assistant या तिन्ही पदाकरिता पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे.
- पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पदवीधर, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक
वय :
खुला गट : 18 ते 38 वर्ष
राखीव गट : 18 ते 43 वर्ष
परीक्षेचे स्वरूप :
- पूर्व परीक्षा – 100 गुण
- मुख्य परीक्षा – 200 गुण
- मुलाखत – 75/50 गुण
पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)
पूर्व परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती
मुख्य परीक्षेचे स्वरूप :
पोलिस निरीक्षक मुख्य परीक्षा :
- एकूण गुण – 200
- पेपर 1 – 100 गुण
मराठी – 60 गुण
इंग्रजी – 40 गुण - पेपर 2 – 100 गुण
यात चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम-2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्या, मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इ. घटकांचा समावेश असतो.
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा :
- एकूण गुण – 200
- पेपर 1 – 100 गुण
मराठी – 60 गुण
इंग्रजी – 40 गुण - पेपर 2 – 100 गुण
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम – 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इ. घटकांचा समावेश असतो.
सहाय्यक मुख्यपरीक्षा :
- एकूण गुण – 200
- पेपर – 1 : 100 गुण
मराठी : 60 गुण
इंग्रजी : 40 गुण - पेपर : 100 गुण
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम –2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्रचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती
- पोलिस उपनिरीक्षक पुरुष शारिरीक चाचणी – एकूण गुण – 200
- थाळीफेक (वजन 7.26 किग्रॅ, अंतर 7.5 मिटर) – गुण 40
- पुल-अप्स – गुण 40
- लांब उडी (4.5 मिटर) – गुण 20
- धावणे (800 मि) 2 मि 30 सेकंद – गुण 100
- पोलिस उपनिरीक्षक महिला शारिरीक चाचणी – एकूण गुण 200
- थाळीफेक (वजन 4.5 किग्रॅ, अंतर 6 मिटर) – गुण 40
- चालणे (3 किमी – 23 मि.) – गुण 80
- धावणे (200मि 37 सेकंद) – गुण 80
MPSC ग्रुप B STI परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा अभ्यासक्रम pdf डाऊनलोड करा | डाऊनलोड करा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा पात्रता माहिती | माहिती पहा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा | डाऊनलोड करा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा पुस्तक यादी | माहिती पहा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा ऑनलाइन टेस्ट सोडवा | टेस्ट सोडवा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा अभ्यास नियोजन | माहिती पहा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा अभ्यास विडियो पहा | विडियो पहा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा हॉल टिकिट डाऊनलोड करा | डाऊनलोड करा |
MPSC ग्रुप B STI परीक्षा App | डाऊनलोड करा |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download