MPSC संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ-8 2022

MPSC संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ-8 2022-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण.

MPSC संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ-8 2022

MPSC संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ-8 2022

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 8-चकाय्या पिटणे – गप्पा-गोष्टी करणे.
चकार शब्द ही न काढणे – जराही न बोलणे.
चहा करणे – वाहवा करणे.
चन्हाट वळणे – कंटाळा आणण्याजोगी गोष्ट सांगणे.
चटणी उडविणे – नाश करणे.
चढाओढ सुरू होणे – स्पर्धा लागणे.
चंदन करणे – नाश करणे.
चक्री गुंग होणे – अक्कल गुंग होणे.
चाहूल लागणे – हालचालीची जाणीव होणे.
चालून जाणे – हल्ला करणे.
चाकांवर पट्टा चढणे – वेग येणे


चारांचा पोशिंदा असणे – कर्ता पुरुष असणे
चार पैसे गाठीला बांधणे – थोडी फार बचत करणे
चारी दिशा मोकळ्या होणे – पूर्ण स्वातंत्र्य असणे.
चालत्या गाड्याला (गाडीस) खीळ घालणे – व्यवस्थित चाललेल्या कामात व्यत्यय येणे.
चालना देणे – प्रोत्साहन देणे.
चाहूल लागणे – माहीत होणे.
चाड असणे – जाणीव असणे.
चाड न वाटणे – जाणीव नसणे.
चांदी उडणे – त्रेघा उडणे.
चालना मिळणे – गती मिळणे.
चाळा लावणे – नाद लावणे.
चारी मुंड्या चीत होणे – संपूर्ण पराभव होणे.
चार हात दूर असणे – एकाद्या गोष्टीपासून हेतू पुरस्सर दूर राहणे.
चिंता लागणे – काळजी वाटणे.
चिंतातूर होणे – अतिशय काळजी वाटणे.
चिरडून टाकणे – नाश करणे.
चित्त खेचून घेणे – मन आकर्षित करणे.
चित्रा सारखे स्तब्ध असणे – फार शांत असणे.
चित्त विचलित होणे – काय करावे ते न सुचणे.


चिरी मिरी घेणे – बक्षीस घेणे.
चिंताक्रांत बनणे – आत्यंतिक काळजी वाटणे.
चिमणीसारखे तोंड करणे – एवढेसे तोंड करणे.
चिटपाखरू नसणे – पूर्ण शांतता असणे.
चीज करणे – सार्थक करणे.
चीतपट मारणे – पूर्ण पराभव करणे.
चुटपुट लागणे – मनास टोचणी लागणे, हुरहुर लागणे.
चुकल्या चुकल्यासारखे होणे – अस्वस्थता प्राप्त होणे.
चुणूक दाखविणे – झलक दाखविणे.
चुलीतून निघून वैलात पडणे – आगीतून निघून फोफाट्यात पडणे, लहान संकाटातून मोठ्या संकटात सापडणे.
चूल पेटणे – स्वयंपाक केला जाणे.
चूल खोळंबणे – उपवास पडणे.
चूर होणे – गढूत जाणे, बुडून जाणे.
चेव चढणे – जोर चढणे.
चेहरा उजळणे – संकट टळल्यामुळे आनंदित होणे.


चेहरा आंबट करणे – नाराजी दर्शविणे.
चेहरा खुलणे – अतिशय आनंदित होणे.
चेहरा पालटणे – रंगरुप बदलणे.
चेहरा काळवंडणे – चिंतेने मन खिन्न होणे.
चेह-यावर चिंतेची काळजी पसरणे – काळजीने भरून जाणे.
चैन न पडणे – अस्वस्थ होणे.
चोहोंचा आकडा घालणे – प्रशस्तपणे मांडी घालून बसणे.
चोख बजावणे – अगदी बरोबर पार पाडणे.
चोरावर मोर होणे – वाईट गोष्टीच्या बाबतीत एखाद्यावर वरकडी करणे.
चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे – ख-या अपराध्यास सोडून निरपराधी व्यक्तीस शिक्षा करणे.

चौगडे अडणे – जयजयकार अथवा प्रशंसा होणे.
चौदावे रत्न दाखविणे – शिक्षा करणे, खूप मार देणे.
चौखुर उधळणे – स्वैर सुटणे.

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply