संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 9

संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 9-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 9-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 9

संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 9

छक्के पंजे करणे – हात चलाखीने फसविणे.
छत्तीसाचा आकडा असणे – मतभेद असणे.
छाती आनंदाने फुलणे – खूप आनंद होऊन अभिमान वाटणे.
छाती करणे – धैर्य दाखविणे.
छाती धडधडणे – खूप भीती वाटणे.
छात्र हरवणे – पोरके होणे.
छाती दडपणे – भीती वाटणे.
छाती न होणे – धीर न होणे, न धजणे, हिंमत न होणे.
छाती दाखवत बसणे – भीती न बाळगता बसणे.
छाती फुगणे – अभिमान वाटणे.
छातीला हात लावून सांगणे – खात्रीपूर्वक सांगणे.
छातीचा कोट करणे – प्राणपणाने संकटाशी मुकाबला करणे.
छातीत कालवायला लागणे – जीव कासावीस होणे.
छाप पडणे – मनावर खोल परिणाम होणे.
छे म्हणणे  – नको म्हणणे 
छेड काढणे – मुद्दाम चिडविणे.
जंगजंग पछाडणे – निरनिराळया रीतीने प्रयत्न करणे.
जगाचा निरोप घेणे – मरण पावणे.
जवळीक वाटणे – आपलेपणा वाटणे.
जवळ करणे – आपलेसे करणे.


जन्माचे दारिद्रय फिटणे – गरिबी कायमची नाहीशी होणे.
जन्माचे सार्थक होणे – सफलता लाभणे.
जमीन अस्मानाचे अंतर (फरक) असणे – खूप मोठा फरक असणे.
जमीनदोस्त होणे – पूर्णपणे नष्ट होणे.
जयजयकार करणे – आनंदाने जयघोष करणे, गुणगान करणे. (जयघोष करणे).
जय्यत तयारी करणे – अगदी पूर्ण तयारी करणे.
जन्माचे कल्याण करणे – कायमचे हित होणे.
जड पावलांनी निघणे – व्यथित होऊन निघणे.
जगजाहीर करणे – सर्वांना माहिती करणे.
जतन करून ठेवणे – काळजीपूर्वक सांभाळ करणे (जपून ठेवणे)
जखमेवर मीठ चोळणे – दुःखद स्थितीत अधिक भर घालणे.
जगातून उठणे – सर्वस्वी बुडणे.
जगणे जनावरांचे असणे – अत्यंत निकृष्ट प्रतीचे जीवन जगणे.
जन्माची माती होणे – जीवन व्यर्थ जाणे.
जशास तसे असणे – तोडीस तोड असणे.
जगणे नकोसे होणे – जीव त्रासणे.
जमदग्नीचा अवतार असणे – अतिशय संतापणे.
जाळ्यात गोवणे – अडचणीत पकडणे.
जाब विचारणे – उत्तर विचारणे.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळणे – स्वतः अनुभवून सुखदुःख जाणणे.
जिभेस हाड नसणे – वाटेल तसे अमर्याद बोलणे, बेजबाबदारपणे बोलणे.
जिवाची तगमग होणे – बेचैन होणे, अस्वस्थ होणे.
जिवाचा कान करून ऐकणे – लक्षपूर्वक ऐकणे.
जिवावर बेतणे – जीव धोक्यात येणे.


जिवापाड सांभाळणे – काळजीपूर्वक सांभाळणे.
जिवापाड श्रम करणे – अतिशय कष्ट करणे.
जिवात जीव घालणे – धैर्य देणे, काळजी नाहीशी होणे.
जिवाचा धडा करणे – निश्चय करणे.
जिवाची उलाघाल होणे – जीव खालीवर होणे.
जिवाला घोर लागणे – खूप काळजी वाटणे.
जिवाचा आटापिटा करणे – खूप धडपड करणे.
जिवाची मुंबई करणे – खूप चैन करणे.
जिवाचे रान करणे – अतिशय कष्ट करणे.
जिवाला जीव देणे – एखाद्यासाठी प्राण देण्याची तयारी असणे.
जिवावर उठणे – आत्यंतिक नुकसान करण्यास तयार होणे.
जिवात जीव येणे – काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे, हायसे वाटणे.
जिवाची पर्वा न करणे – प्रत्यक्ष प्राणाचीही फिकीर न करणे.
जिवावर उदार होणे – प्राण देण्यास तयार असणे.

जिवास खाणे – मनाला लागणे.
जिव्हारी लागणे – अतिशय वाईट वाटणे.
जिद्द असणे – ईर्षा असणे.
जिंदगी बस्तर होणे – जीवन नष्ट होणे.
जिभेला पाणी सुटणे – खाण्याची इच्छा होणे.
जिज्ञासा वाटणे – जाणून घेण्याची तीव्र इच्छा होणे.
जिवा पलीकडे जपणे – खूप काळाजी घेणे.

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply