संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 2
Sayli Bhokre
November 24, 2021
Marathi Grammar Notes
96 Views
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 2 अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले, पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे – कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास – अन्न न खाणे;पण त्यात मन असणे अळी मिळी गुप चिळी – रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. अहो रूपम अहो ध्वनी – एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. अचाट खाणे मसणात जाणे – खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो अपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अल्प बुद्धी बहू गर्दी – कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो अटकाव नाही तेथे धुडगूस – जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये – अपरिचित माणसाशी सलगी करू नये अंधारात चोरास बळ – अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढते अघळपघळ अन् घाल गोंधळ – मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते आयत्या बिळावर नागोबा – एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आढीच्या दिढी सावकाराची सढी – अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो अंधारात केले पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येते आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच भरकट्यात त्यात मद्य प्यायलेला आसू ना मासू कुत्र्याची सासू – जिथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही आडातला बेडूक समुद्राची गोष्ट सांगे – संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे आप सुखी तर जग सुखी – आपण आनंदात असलो की सारे जग आनंदात आहे असे वाटते आयत्या पिठावर रांगोळी – दुसर्याच्या परिश्रमा वर फायदा घेणे आपले नाही धड नाही शेजार्यांचा कढ – कोणाविषयी प्रेम नसणे आपले नाक कापून दुसर्याचा अपशकुन – आपले नुकसान करायचे पण दुसर्याचे पण करायचे आपण शेन खायच नि दुसर्याच तोंड हुंगावायच – आपले दोष दुसर्यावर लादायचे प्रयत्न करणे आले अंगावर तर घेतले शिंगावर – आयता मिळालेला फायदा करून घेणे आपल्या कानी सात बाळ्या – एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे आईजीच्या जीवावर बाईजी उदार – दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021-म्हणी 1 Link संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021-म्हणी 2 Link