संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 6

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 6 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 6

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 6

  • कानात बुगडी, गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
  • काळ्या दगडावरची रेघ  – न बदलणारी गोष्ट 
  • कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच – कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
  • कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी – कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
  • कोल्हा काकडीला राजी –  क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
  • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
  • केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले – एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
  • कोळसा उगाळावा तितका काळाच – वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
  • कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी – चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
  • कोरड्याबरोबर ओले ही जळते – निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
  • कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही – निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
  • काखेत कळसा नि गावाला वळसा – हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
  • काप गेले नी भोके राहिले  – वैभव गेले नी फक्त त्याच्या खुणा राहिले 
  • कोल्ह्याला द्राक्ष आंबट  – आपल्याला न मिळणार्‍या गोष्टीला कमी लेखने 
  • कसायला गाय धार्जिणी – दृष्ट व कठोर माणसाशी सर्व लोक नम्रतेने वागतात 
  • करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय  – प्रत्येक गोष्टीच्या वाढीला मर्यादा असतेच 
  • कान  आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर असते  – ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते 
  • काळीचोर तो माळीचोर  – जो लहानपणी चोरी करतो असे सिद्ध झाले तर त्याचेवर पुढे मोठ्या चोरीचा आळ आणतात 
  • काकडीची चोरी फाशीची शिक्षा  – लहान अपराधाला मोठी शिक्षा 
  • काने कोपरे विसरू नका पायली पसा भुलू नका  – शेताचा काना कोपरा पेरला गेला पाहिजे नाहीतर पीक कमी येते 
  • कुळास कान ठेवी ध्यान  – भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्यात म्हणजे बाहेर फुटतात 
  • कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामबट्टाची तट्टानी  – एक अतिशय थोर तर एक अतिशय शूद्र 
  • केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी – अत्यंत गरिबीची अवस्था 
  • कंबरेचे सोडलं डोक्‍याला बांधलं – लाज लज्जा पार सोडून देणे 
  • कालच्या वाणी भलभल पाणी  – सारखे दिवस सारखे असणे 
  • काम नाही कवडीच फुरसत नाही घडीची  – काम करीत असणे पण ते दिसत नाही 
  • कोंबड्यापुढे मोती  – मूर्खापुढे पैशाचा ढीग 
  • कानाला ठणका व नाकाला औषध  – रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे 
  • केर डोळ्यात फुंकर कानात  – भलत्या जागी भलताच उपाय 
  • कुचेष्टेवाचून प्रतिष्ठा नाही  – प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आधी त्रास घ्यावा लागतो  
  • काल मेला आणि आज पितर झाला  – हातात थोडासा अधिकार येताच सत्ता गाजविणे 

Free Job Alert App

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply